Pratyusha Banerjee And Boyfriend Rahul Raj Singh Revealed She Used To Make Videos Of Hanging Saam Tv
मनोरंजन बातम्या

Pratyusha Banerjee Boyfriend: प्रत्युषाच्या मृत्यूवर बॉयफ्रेंड राहुलने ७ वर्षांनी सोडलं मौन; ‘त्या’ रात्रीचा किस्सा केला शेअर

प्रत्युषा बॅनर्जीच्या निधनानंतर तिचा बॉयफ्रेंड राहुलच्या लाईफमध्ये काय परिणाम झाला आणि कोणता बदल झाला याबद्दल त्याने सांगितलं.

Chetan Bodke

Pratyusha Banerjee Boyfriend: हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी ‘बालिका वधू’ या मालिकेमुळे ती बरीच चर्चेत आली होती. प्रत्युषाने १ एप्रिल २०१६ मध्ये तिच्या गोरेगावमधील फ्लॅटमध्ये तिचा पार्टनर राहुल राज सिंहच्या त्रासाला कंटाळून आत्माहत्या केली. प्रत्युषाने अचानक मृत्यूला कवटाळत आपले जीवन संपवल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. प्रत्युषाने त्याच्या त्रासाला कंटाळत आत्महत्या केल्याने सर्वच स्तरातून तिच्या बॉयफ्रेंडवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. त्याला अटक केल्यानंतर तीन महिन्यांनी त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल सिंगने तब्बल अनेक वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर ‘बेपरवाह २’ च्या माध्यमातून इंडस्ट्रित पुन:रागमन करणार आहे. नुकताच राहुलने ‘आज तक’ सोबत संवाद साधला. यावेळी त्याने त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रत्युषा बॅनर्जीच्या निधनानंतर त्याच्या लाईफमध्ये काय परिणाम झाला आणि कोणता बदल झाला याबद्दल त्याने सांगितलं. नंतर त्याने प्रत्युषाच्या मृत्यूबद्दल बोलताना राहुलने खुलासा केला की, तिच्या मृत्यूनंतर काही दिवस तो त्याच दु:खात होता. झोप न येत असल्यामुळे तो नेहमीच औषधे आणि इंजेक्शन्सचा वापर करायाचा.

त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत तो स्वत: बोलला... ‘मी कोणाच्या मृत्यूला दोष कसा देऊ शकतो?’ तो पुढे म्हणाला की, १ एप्रिलला प्रत्युषाने आपले जीवन संपवण्याच्या आदल्या दिवशी आम्ही दोघांनीही बराच वेळ एकत्र घालवला होता. प्रत्युषा नेहमीच तिच्या आई- वडिलांवर असलेल्या कर्जाच्या चिंतेत असायची.

मी तिला कोणत्याही गोष्टींनी भडकवले नसून, तिने आपल्या विचारांमुळेच तिचे जीवन संपवले. अनेकदा राहुलला घाबरवण्यासाठी प्रत्युषाने आत्महत्या करतानाचे व्हिडीओ बनवत घाबरवायचा प्रयत्न केला आहे.

प्रत्युषाच्या आत्महत्येला अनेक काळ जरी झाले असले, तरी तिच्या निधनाचे वृत्त ऐकुन कोणालाच खरं वाटत नाही. प्रत्युषाने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘झलक दिखला जा 5’, ‘बिग बॉस 7’, ‘हम हैं ना’ आणि ‘ससुराल सिमर का’ सारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

Visapur Fort History: महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी विसापूर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT