Adipurush Trailer Release Date
Adipurush Trailer Release Date Saam TV
मनोरंजन बातम्या

Adipurush Trailer: प्रतीक्षा संपली! रामाच्या रूपात येतोय प्रभास; 'या' तारखेला रिलीज होणार 'आदिपुरुष'चा ट्रेलर!

Satish Kengar

Adipurush Trailer Release Date: प्रभासचा आगामी चित्रपट 'आदिपुरुष'ची (Adipurush Release Date) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेनॉन, सनी सिंह आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.

'आदिपुरुष'चे दिग्दर्शन ओम राऊत याने केले आहे. त्याचा हा चित्रपट रामायणावर (Ramayan) आधारित आहे. आत्तापर्यंत 'आदिपुरुष' चित्रपटाशी संबंधित प्रभास, क्रिती सेनॉन आणि सनी सिंहचे अनेक पोस्टर रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये तिघेही राम, सीता आणि लक्षच्या लूकमध्ये दिसत होते. आता 'आदिपुरुष' चित्रपटाच्या ट्रेलरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

आदिपुरुषचा ट्रेलर कधी रिलीज होणार आहे यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. स्वतः प्रभासने एक ट्वीट करून सांगितलं आहे की, 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर 9 मे रोजी रिलीज होणार. 9 मे रोजी संध्याकाळी हैदराबादमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल आणि हा ट्रेलर प्रदर्शित केला जाईल. 'आदिपुरुष' चित्रपटाचा ट्रेलर जवळपास 3 मिनिटांचा असल्याचे सांगण्यात येत आहे.  (Latest Entertainment News)

'आदिपुरुष' हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट गेल्या 2 वर्षांपासून चर्चेत आहे. गेल्या वर्षी 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये राम आणि रावण म्हणजेच सैफ अली खानच्या लूकवर बराच वाद झाला होता.

इतकेच नाही तर काही दर्शकांनी 'आदिपुरुष' चित्रपटाचे VFX देखील अतिशय खालच्या दर्जाचे असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत निर्मात्यांनी चित्रपटात काही सुधारणा केल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: छगन भुजबळ खरंच नाराज? भुजबळांची भेट घेत गिरीश महाजनांनी सांगितलं खरं कारण

Sangli : 'शिवप्रतिष्ठान'ची प्रशासनास दाेन दिवसांची मुदत, सांगली बंदचा दिला इशारा;जाणून घ्या नेमकं कारण

Sonali Bendre: क्या खुब लगती हो; बॉलिवूड सुंदरीचा झक्कास लूक!

Maharashtra Politics: राज्यात मोदी - अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीसांविरोधात मोठी लाट: संजय राऊत

Today's Marathi News Live : कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आता आम आदमी पक्षावरच कारवाई होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT