Adipurush Screaning Viral Photo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Adipurush Hanuman Seat: थिएटरमध्ये हनुमानासाठी खास बुकिंग, फुलांनी सजवली खुर्ची, आदिपुरूष’च्या स्क्रिनिंगमधला फोटो व्हायरल...

Adipurush Screening Viral Photo: थिएटरमधील राम आणि सीता, हनुमानाची फुलांच्या पाकळ्या आणि हारांनी सजवलेल्या फ्रेमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Adipurush Film: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपट आजपासून थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला वाढता प्रतिसाद पाहता सकाळपासूनच चित्रपटाचे शो थिएटर्समध्ये लागले आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला बंपर ओपनिंग मिळण्याची शक्यता ट्रेड ॲनालिस्टकडून आहे. आदिपुरुषने आगाऊ बुकींगच्या संख्येतील रेकॉर्डसह बॉक्स ऑफिसला आग लावली आहे. ओम राऊतच्या या चित्रपटात प्रभासने प्रभु राम, कृती सेनॉनने सीतेच्या भूमिकेत, सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत तर देवदत्त नाग हनुमानाच्या भूमिकेत आहे.

गेल्या आठवड्यात, निर्मात्यांनी एक विशेष घोषणा केली होती. ती घोषणा म्हणजे, चित्रपटाच्या स्क्रिनिंग दरम्यान प्रत्येक थिएटरमध्ये भगवान हनुमानासाठी एक जागा आरक्षित करण्यात येणार आहे. निर्मात्यांनी सांगितले की, “जिथे रामायणाचे वाचन केले जाते, तेथे हनुमानाची श्रद्धा असते, ही आमची श्रद्धा आहे. या श्रद्धेचा आदर करून, प्रभासचा राम-स्टारर आदिपुरुष प्रदर्शित होणार्‍या प्रत्येक थिएटरमध्ये भगवान हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवली जाईल. त्या तिकिटाची विक्री न करता हनुमानासाठी ते सीट बुक आधीपासूनच रिझर्व असेल.” (Bollywood Actor)

गुरुवारी १५ जून रोजी चित्रपट प्रदर्शनापूर्वी, थिएटर मालकांचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राम आणि सीता, हनुमानाची फुलांच्या पाकळ्या आणि हारांनी सजवलेल्या फ्रेमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून सोशल मीडियावर त्या फोटोची बरीच चर्चा सुरू आहे.या निर्णायावरून निर्मात्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Bollywood Film)

अनेक मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, हनुमानाच्या सीटच्या शेजारी असलेल्या सीटांच्या तिकिटाची किंमत ही जास्त आहे. यावर टी- सिरीजकडून काही अफवांवर त्यांचे स्पष्टीकरण देखील दिले आहे. “फसवणूक अलर्ट, चित्रपटांच्या तिकिटाच्या किंमतीबाबत माध्यमांमध्ये दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात आहे. आम्ही सांगू इच्छितो, हनुमानाच्या सीटच्या शेजारी असलेल्या सीटांच्या तिकिटाची किंमतीत काहीही बदल नाही. खोट्या बातम्यांना बळी पडू नका! जय श्री राम!.” (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न - महेश गायकवाड

Prajakta Mali Farmhouse: निसर्गाच्या सानिध्यात वसलंय प्राजक्ताचं सुंदर 'प्राजक्तकुंज'; फार्महाउसचं एका दिवसाचं भाडं किती?

Viral Video: रिल्सच्या नादात जीवाशी खेळ, उंच पुलावरून चालत चालत निघाला, मग पुढे काय झालं तुम्हीच पाहा

IPL 2025 Mega Auction: इटलीचा हा स्टार IPL ऑक्शन गाजवणार! मुंबई इंडियन्ससोबत आहे खास कनेक्शन

Tanaji Sawant : विकास न झालेलं गाव दाखवा आणि १ लाख मिळवा, तानाजी सावंतांचे मतदारांना चॅलेंज!

SCROLL FOR NEXT