Adinath Kothare Received Best Actor Award
Adinath Kothare Received Best Actor Award Instagram @adinathkothare
मनोरंजन बातम्या

Dada Saheb Phalke Award 2023 Best Actor: आदिनाथ कोठारेला मिळाला मोठा मान; दादासाहेब फाळके पुरस्काराने झाला सन्मानित

Pooja Dange

Adinath Kothare Received Dada Saheb Phalke Award: 20 मे रोजी मुंबईत दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन अवॉर्ड सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला सिनेजगतातील अनेक कलाकार उपस्थित होते. कलाकारांच्या कामाचा आणि योगदानाचा सन्मान करण्यात आला.

अभिनेता आदिनाथ कोठारेला या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आदिनाथने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वतः याची माहिती दिली आहे. (Latest Entertainment News)

आदिनाथ कोठारेने दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार हातात घेऊन त्याचा फोटो शेअर केला आहे. आदिनाथने कॅप्शनमध्ये त्याला हा पुरस्कार मिळाल्याचे सांगत आनंद व्यक्त केला आहे. आदिनाथने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, चंद्रमुखी या चित्रपटासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवॉर्ड्स मिळाल्याबद्दल नम्र आणि कृतज्ञ आहे!'

आदिनाथच्या या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. समीर चौघुले, प्रसाद ओक, सोनाली खरे यांनी कमेंट करत आदिनाथचे अभिनंदन केले आहे.

Dadasaheb Phalke Film Foundation Awards 2023 मुंबईतील मुकेश पटेल सभागृहात २० मे रोजी पार पडला. 'दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन' पुरस्कार सोहळ्यामध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवॉर्ड्स हा मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो.

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान, ज्येष्ठ अभिनेत्री मनीषा कोईराला, कार्तिक आर्यन यांसारख्या अनेक दिग्गजांनी यापूर्वी झालेल्या दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात यापुर्वी भाग घेतला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT