Adil Durrani Files Rs 200 crore Defamation Case Against Rakhi Sawant Instagram @rakhisawant2511
मनोरंजन बातम्या

Adil Durrani Defamation Case: राखी सावंतच्या विभक्त नवऱ्याने तिच्याकडे मागितले २०० कोटी रुपये, नेमकं काय आहे प्रकरण...

Adil Durrani And Rakhi Sawant News: राखीचा विभक्त पती आदिल खानने तिच्याविरोधात २०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

Chetan Bodke

Adil Durrani Files Rs 200 crore Defamation Case Against Rakhi Sawant

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. राखीचा पती आदिल खानची गेल्या काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटका झाली. त्याची सुटका होताच, त्याने राखीवर आरोप केलेत. सध्या त्याने केलेल्या आरोपांची सर्वत्र जोरदार चर्चा होते. नुकतीच राखी उमराह करण्यासाठी मक्काला गेली होती. भारतात परतताच तिने पुन्हा आदिलवर काही आरोप केले होते. त्यानंतर आदिल खानने राखी विरोधात २०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

दोघांमधील वाद काही कमी होण्याचं नाव घेत नाही. आदिल खानने राखी विरोधात २०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. राखी आणि आदिल खान दुर्रानी यांच्यातील वाद काही कमी होण्याचं नाव घेत नाही. सध्या सोशल मीडियावर आदिल खान दुर्रानीने राखी सावंतवर काही आरोप करत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत आदिल राखीवर मानहानीचा आरोप करत असल्याचे दिसून येत आहे. पण आदिलने राखीवर तब्बल २०० कोटी रुपयांचा खटला दाखल केला आहे.

जेव्हा आदिल राखी विरोधात खटला दाखल करण्यासाठी न्यायालयात पोहोचला, त्यावेळी राखीवर कोणती केस दाखल केली? असा प्रश्न विचारला त्यावर त्याने उत्तर दिले की, मी राखीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यासाठी आलो आहे. जर राखी माझ्यावर खोटे आरोप करून १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करू शकते. तर आता तिच्यावरही मी असे नक्कीच गुन्हे दाखल करू शकेल. यावेळी, आदिलसोबत त्याचा वकील देखील उपस्थित होता, त्यावेळी आदिलच्या वकीलांनी राखीवर कोणकोणते कलम लावले आहेत, याची माहिती दिली.

सर्व कायदेशीर बाबींबद्दल आदिलच्या वकिलाने सांगितले की, “आम्ही राखी सावंतविरुद्ध कलम २०० सीआरपीसी कायद्यांतर्गत मानहानीचा खटला दाखल केला आहे. आता या प्रकरणावर राखीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. राखी या प्रकरणात कोणतं पाऊल उचलणार ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates: नांदेडमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा

​​Nashik Ring Road: विकासाकडे नेणारा रिंगरोड; नाशिक ते तिरुपतीचा १३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण होणार १२ तासात

Central Railway : मुंबई ते सावंतवाडी रोड, चिपळूण विशेष रेल्वेगाडी चालविण्याची कोकणवासियांची मागणी, कारण काय? वाचा

Saam TV exit poll: वसई-विरारमध्ये बहुजन विकास पक्ष सत्ता राखणार? भाजपचे प्रयत्न अपुरे ठरण्याची शक्यता

Saam Tv Exit Poll: कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष, भाजपला किती जागा मिळणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT