Adah Sharma-Shreyas Talpade Upcoming Movie The Game Of Girgit Instagram @adah_ki_adah
मनोरंजन बातम्या

Adah Sharma Birthday Gift: अदा शर्माचं बेस्ट बर्थडे गिफ्ट: 'द केरला स्टोरी'नंतर 'द गेम ऑफ गिरगिट' या नवीन चित्रपटाची घोषणा

Adah Sharma New Movie The Game Of Girgit: अदाचा पुढचा चित्रपट 'द गेम ऑफ गिरगिट' ची घोषणाही झाली आहे.

Pooja Dange

Adah Sharma-Shreyas Talpade Upcoming Movie: 'द केरला स्टोरी'मुळे सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री अदा शर्माचा आज ३१ वा वाढदिवस आहे. अदाचा 'द केरला स्टोरी' हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असला तरी बॉक्स ऑफिसवर दमरदार कमाई करत आहे.

अदा शर्माच्या 'द केरला स्टोरी'ची चर्चा सुरू असताना आता तिच्या आगामी 'द गेम ऑफ गिरगिट' या चित्रपटाची घोषणा झाली आहे. अदाच्या या आगामी चित्रपटाबाबत चित्रपट निर्मात्यांनी घोषणा केली आहे. या नव्या चित्रपटात अदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. (Latest Entertainment News)

'द केरला स्टोरी'मुळे अदाचे सगळीकडे कौतुक होत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आता अदाचा पुढचा चित्रपट 'द गेम ऑफ गिरगिट' ची घोषणाही झाली आहे. या चित्रपटामध्ये अदा, श्रेयस तळपदेसोबत दिसणार आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाची निर्मिती गंधार फिल्म्स अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेडने केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल पांड्या करणार आहेत.

'द गेम ऑफ गिरगिट'मध्ये अदाला श्रेयस तळपदेच्या विरुद्ध भूमिका साकारणार आहे. अदा आणि श्रेयसचा आगामी चित्रपट 'द गेम ऑफ गिरगित' हा प्रसिद्ध ब्लू व्हेल गेमवर आधारित आहे, जो काही वर्षपूर्वी खूप चर्चेत होता.

वास्तविक हा गेम खेळणाऱ्या अनेक मुलांनी आत्महत्या केली होती. यामुळे खळबळ उडाली होती. या गेमला व्हेल चॅलेंज असेही म्हणतात, ज्यामध्ये खेळाडूला काही टास्क करावे लागायचे आणि शेवटी खेळाडूला आत्महत्या करावी लागायची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेप

SCROLL FOR NEXT