Yami Gautam-Aditya Dhar Welcome Baby Boy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yami Gautam Welcome Baby Boy : यामी गौतमने दिला गोंडस मुलाला जन्म, फोटो शेअर करत सांगितलं नाव

Yami Gautam-Aditya Dhar Welcome Baby Boy : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. २० मे रोजी 'अक्षय्य तृतीया'च्या दिवशी यामीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. २० मे रोजी 'अक्षय्य तृतीया'च्या दिवशी यामीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. अवघ्या काही तासांपूर्वीच यामीने चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘गुड न्यूज’ दिलेली आहे. त्या सोबतच अभिनेत्रीने मुलाचं नावसुद्धा या पोस्टमधून सांगितले आहे. यामीने आपल्या लेकाचं नाव ‘वेदाविद’ असं ठेवलं असून तिने या नावाचा अर्थही चाहत्यांना सांगितला आहे.

यामीने २०२१ मध्ये बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धर याच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या कपलने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. यामी आणि आदित्यने त्यांच्या मुलाचं नाव ‘वेदाविद’ (Vedavid) असं ठेवलं आहे. वेद (Veda) आणि विद (Vid) या शब्दांनी मिळून नाव बनवलं आहे. सध्या यामी आणि आदित्यने त्यांच्या लेकाच्या ठेवलेल्या नावाची जोरदार चर्चा होत आहे.

यामी गौतमने शेअर केलेल्या फोटोमध्ये श्रीकृष्णाच्या कडेवर छोटं बाळ असल्याचा एक सुंदर फोटो आहे. फोटो शेअर करताना कॅप्शन दिले की, "डॉक्टरांच्या टीमचे खूप खूप आभार ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आमच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला आहे. बाळाच्या उज्वल भविष्यासाठी पालक म्हणून आमचा नवीन प्रवास सुरु झाला आहे. तो भविष्यात जे काही करेल ते आमच्या कुटुंबाला आणि देशालाही अभिमान वाटावं असं असेल ही आशा आम्ही व्यक्त करतो."

यामीच्या या पोस्टवर चाहत्यांसह बऱ्याच सेलिब्रिटींनी कमेंट करत आदित्य आणि यामीला शुभेच्छा दिल्या आहेत. रणवीर सिंग, हृतिक रोशन, आयुषमान खुराना, मृणाल ठाकूर, प्रियामणी राज, नेहा धुपिया, राशी खन्ना, वाणी कपूर, विशाल मल्होत्रासह अनेक सेलिब्रिटींनी यामी आणि आदित्यवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यामी प्रग्नेंट असल्याचं वृत्त ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटच्या वेळी जाहीर केलं होतं.

यामी गौतमच्या कामाबद्दल बोलायचं तर, यामीने बॉलिवूडमध्ये ‘विकी डोनर’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. ती शेवटची ‘आर्टिकल 370’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यापूर्वी अभिनेत्री ‘ओमजी २’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामी गौतमला सर्वाधिक प्रसिद्धी ब्युटी क्रिमच्या जाहिरातीने मिळवून दिली. यामीने ‘काबिल’, ‘बदलापूर’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘बाला’, ‘भूत पोलीस’, ‘अ थर्स्डे’, ‘दसवी’, ‘चोर निकल के भागा’, ‘ओह माय गॉड 2’, ‘आर्टिकल 370’ सारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder eKYC: फक्त २ मिनिटांत करा एलपीजी गॅस सिलिंडरची ईकेवायसी ; स्टेप बाय स्टेप करा फॉलो; अन्यथा मिळणार नाही सब्सिडी

स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट, नाशिकच्या डॉ. अमोल पाटलांबद्दल धक्कादायक माहिती समोर, ९६ महिलांचे...

Social Media Use: सोशल मीडियावर तासनतास घालवल्याने डिप्रेशनचा धोका वाढतो का? जाणून घ्या ७ महत्त्वाच्या गोष्टी

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

SCROLL FOR NEXT