Urmila Sanawar arrest news 
मनोरंजन बातम्या

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीला अखेर अटक, भाजपच्या माजी आमदाराच्या मुलीला धमकावलं अन्...

Urmila Sanawar arrest news : उत्तराखंडमध्ये अभिनेत्री उर्मिला सनावर यांना माजी भाजप आमदार सुरेश राठोड यांच्या मुलीने केलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश रिसॉर्ट हत्या प्रकरणातील व्हीआयपी ऑडिओ टेपमुळेही त्या चर्चेत आल्या होत्या.

Namdeo Kumbhar

Actress Urmila Sanawar : उत्तराखंडमधील डेहराडूनमधून अभिनेत्रीला बेड्या ठोकल्या आहेत. ऋषिकेश हत्या प्रकरणाशी संबंधित 'व्हीआयपी' ऑडिओ टेप प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री उर्मिला सनावर हिला अटक करण्यात आली. भाजपचे माजी आमदार सुरेश राठोड यांच्या मुलीकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप तिच्यावर आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने हरिद्वारमधील रानीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून अभिनेत्रीला बेड्या ठोकल्या आहेत.

माजी भाजप आमदार सुरेश राठोड यांच्या मुलीने अभिनेत्री उर्मिला सनावरवर ५ कोटी रुपयांची खंडणी, रविदास धाम मालमत्ता नावावर करण्याची मागणी आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत केली होती. पोलिसांनी रविवारी राणीपूर पोलीस ठाण्यात खंडणी आणि गुन्हेगारी धमकीच्या आरोपांखाली आणि आक्षेपार्ह सोशल मीडिया टिप्पणी केल्याच्या आरोपांसंदर्भात एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री उर्मिलाला बेड्या ठोकल्या आहेत.

उर्मिला सनावर यांनी प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगची सीबीआयकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे. त्यातच आता अटकेची कारवाई झाली आहे. या रेकॉर्डिंगमध्ये २०२२ च्या ऋषिकेश रिसॉर्ट हत्याकांडातील एका राजकीयदृष्ट्या प्रभावशाली 'व्हीआयपी'ची ओळख उघड झाल्याचा आरोप आहे. ज्वालापूरच्या माजी आमदारांच्या मुलीने तक्रारीत सनावर हिच्यावर गंभीर आरोप केला.

सनावरने तिला शनिवारी रात्री फोन करून ५ कोटी रुपये आणि रविदास धाम मालमत्तेचे तिच्या नावावर हस्तांतरण करण्याची मागणी केली. मागण्या पूर्ण न झाल्यास कुटुंबातील सदस्यांना ठार मारण्याची आणि राठोर यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने पुढे असा आरोप केला की, सनावरने सोशल मीडियावर तिच्या वडिलांबद्दल अपमानजनक टिप्पणी केली. डेहराडूनमधील एका महिलेसह इतरांशी त्यांचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आणि त्यांना चपलेने मारण्याची धमकी दिली.

हरिद्वारचे एसएसपी नवनीत सिंग भुल्लर यांनी ‘टीओआय’ला (TOI) दिलेल्या माहितीनुसार, "माजी आमदार सुरेश राठोड यांच्या मुलीने रविवारी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे उर्मिला सनावर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सध्या त्यांना न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे."

पोलीस नोंदींनुसार, अभिनेत्री उर्मिला सनावरविरोधात याआधीही सहारनपूर, डेहराडून, राणीपूर आणि हरिद्वार येथे एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. राठोड यांच्या मुलीने गेल्या वर्षी दाखल केलेल्या एका तक्रारीनंतर ही नवी तक्रार समोर आली आहे. यापूर्वीच्या तक्रारीत, सनावर आणि तिच्या एका पुरुष सहकाऱ्याने आपले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप तिने केला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी पुरुष आरोपीला अटक करून न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले होते.

दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी सनावर आणि राठोड हे दोघेही डेहराडून येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर झाले होते. तेथे दोघांनीही २०२२ मधील गाजलेल्या ऋषिकेश रिसॉर्ट हत्याकांडाप्रकरणी 'नार्को चाचणी' (Narco-analysis Test) करून घेण्यास संमती दर्शवली होती. या नार्को चाचणीच्या प्रकरणावर २६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात पुढील सुनावणी होणार होती, मात्र त्याआधीच सनावरला अटक झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वाद मिटता मिटेना

Anarase Recipe: दिवाळीच्या फराळात बनवा खुसखुशीत आणि गोड अनारसे, वाचा ही सोपी स्पेशल रेसिपी

Tea Benefits For Heart Health: रोज 1 कप चहामुळे कमी होतो हृदयविकाराचा धोका? नवीन अभ्यासात समोर आली आश्चर्यकारक माहिती

PM Kisan Yojana : खुशखबर! पीएम किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला मिळणार, या शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात

Banana Peels Benefits For Skin : त्वचेवर केळीची साल लावा, डार्क सर्कल होतील गायब आणि चेहरा दिसेल काचेसारखा

SCROLL FOR NEXT