Urmila Kothare recovering after car accident Saam TV
मनोरंजन बातम्या

Urmila Kothare : 'मी पडून नाही राहिले'; अपघातातून वाचल्यानंतर उर्मिला अशी घेते स्वतःची काळजी!

Urmila Kothare recovering after car accident : अभिनेत्री उर्मिला कोठारेने अपघातानंतर एक व्हिडीओ पोस्ट करून तिच्या तब्येतीची अपडेट चाहत्यांना देत ती स्वतःची काळजी कशी घेत आहे हे चाहत्यांना सांगितले आहे.

Shruti Vilas Kadam

Urmila Kothare : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे हिच्या गाडीचा २८ डिसेंबर रोजी मोठा अपघात झाला होता. या अपघातात १ मजुराचा मृत्यू झाला असून १ मजूर गंबीर जखमी झाला होता. तर उर्मिला आणि तिचा ड्राइव्हर देखील जखमी झाले होते. उर्मिला तिच्या घरी आली असून हळू हळू बारी होत आहे. दरम्यान, उर्मिला या अपघातातून बरी होण्यासाठी कशी स्वतःची काळजी घेत आहे याचा व्हिडीओ तिने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे

या व्हिडीओमध्ये उर्मिलाने अपघातानंतर स्वतःला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी ती काय करते हे सांगितलं आहे. उर्मिला म्हणाली, हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर पडून राहणं खूप कंटाळवाण वाटत. पण खरं तर मी पडून राहिले नाही. एका जागेवर पडून राहणं मला शक्य नाही कारण तुम्हाला माहिती आहे, मी फिजिकली किती सक्रिय व्यक्ती आहे. अपघात किंवा सर्जरीसारख्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडला की खूप फरक पडतो. माझ्याबरोबर एक मोठा अपघात झाला. त्यानंतर मी माझी फिटनेस जर्नी सुरू केली आहे. यासाठी मी खूप काळाचा व्यत्यय येऊ देत नाही.”

उर्मिला रोज योगा करते पण हा योग करताना शरीराला ताण न देता जेवढं सहन होईल तेवढीच शरीराची हालचाल करत आहेत. तिचा हा व्हिडीओ पासून त्यावर अनेक संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. काही नेटकरी तिच्या या व्हिडीओचे कौतुक करत लवकर बारी हो काळजी घे असा सल्ला देत आहेत. तर काही नेटकरी मृत पावलेल्या मजुराविषयी जाब विचारत आहेत.

दरम्यान, उर्मिलाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, शेवटची ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसली होती. या मालिकेत तिने वैदेही ही भूमिका साकारली असून आता ही मालिका बंद झाली आहे. मालिका संपल्यानंतर उर्मिला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT