Actress Bought New Home Saam tv
मनोरंजन बातम्या

Actress Bought New Home: प्रसिद्ध अभिनेत्रीने वर्सोवामध्ये खरेदी केलं कोट्यवधीचं आलिशान घर, किंमत वाचून व्हाल हैराण

Actress Bought New Home: अभिनेत्री तब्बूने मुंबईतील वर्सोवा भागात 10 कोटींचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले. तिच्या या गुंतवणुकीची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

Shruti Vilas Kadam

Actress Bought New Home: बॉलिवूडमधील दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तबू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी तिच्या चित्रपटांमुळे नव्हे तर रिअल इस्टेटमधील केलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे. तब्बूने मुंबईतील वर्सोवा परिसरात सुमारे 10 कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या खरेदीमुळे ती पुन्हा एकदा बॉलिवूडमधील टॉप सेलिब्रिटींच्या यादीत चर्चेत आली आहे.

‘लिआसेस फोरास’ने दिलेल्या माहितीनुसार, हे अपार्टमेंट अत्यंत प्रीमियम प्रोजेक्टमध्ये असून त्यामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. समुद्राच्या जवळ असलेला वर्सोवा परिसर हा अनेक कलाकारांचा आवडता ठिकाण मानला जातो. २६ मार्च २०२६ रोजी या घराची नोंदणी करण्यात आली असून, यासाठी तिने ५.२४ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी मोजली आहे. या घरात १२७ स्क्वेअर फूटची प्रशस्त बाल्कनी आणि दोन कार पार्किंगच्या जागांचा समावेश आहे. 

घराची माहीती

हे नवीन अपार्टमेंट वर्सोवा येथील ‘गोदरेज स्कायशोर’ या इमारतीत आहे. या घराचे क्षेत्रफळ २,१५३ स्क्वेअर फूट असून त्यात १२७ स्क्वेअर फूटची बाल्कनी देखील आहे.  ‘गोदरेज स्कायशोर’ हा प्रकल्प २७,००० स्क्वेअर फूटपेक्षा जास्त जागेवर उभारला जात आहे. या प्रकल्पामध्ये ‘ए’ आणि ‘बी’ असे दोन टॉवर्स असतील. या इमारतींमध्ये पाच बेसमेंट आणि वर २४ मजले असणार आहेत.

तब्बूच्या कामाबद्दल

दरम्यान, तब्बूच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तीची भूत बंगलामध्ये एक महत्वाची भूमिका आहे. तसेच लवकरच ती काही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. तिच्या अभिनयाची छाप कायम ठेवत ती बॉलिवूडमध्ये आपले स्थान अधिक भक्कम करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

SCROLL FOR NEXT