Somy Ali Instagram @realsomyali
मनोरंजन बातम्या

Salman Khan: एक्स गर्लफ्रेंडचे सलमान खानवर गंभीर आरोप; म्हणाली, सिगारेटचे चटके द्यायचा, मारहाण करायचा...

सोमी अलीने सलमानसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे आणि सलमानवर तिला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

Pooja Dange

Somy Ali Makes Shocking Allegations: अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमी अलीने बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानवर निशाणा साधला आहे. सोमी अलीने सलमानसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे आणि सलमानवर तिला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. परंतु सोमीने नंतर ही पोस्ट डिलीट देखील केली आहे.

सोमी अली अभिनेत्री तर आहेच. तसेच ती सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड देखील आहे. त्यांचे नाते खूप काळ टिकू शकले नाही. तरीही दोघांच्या अफेअरची चर्चा होत असते. सोमी आणि सलमानच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे आणि म्हणूनच सोमी तिच्या पोस्टच्या माध्यमातून सलमानवर निशाणा साधत असते. सोमीने तिच्या नवीन पोस्टच्या माध्यमातून सलमान खानवर अनेक आरोप लावले आहेत.

सोमीने सलमान खानसोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान खान तिला गुलाबाचे फूल देताना दिसत आहे. सोमीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आता खूप काही होणार आहे. माझ्या कार्यक्रमावर भारतात बंदी आणली आणि कारवाई करून मला धमकावले जात आहे. तू भित्रा आहेस. इथे माझा प्रोजेस्ट करण्यासाठी ५० वकील उभे आहेत. जे मला सिगारेटच्या चटक्यांपासून आणि फिसिकल अब्युजपासून मला वाचवतील, जे तू माझ्यासोबत अनेक वर्ष केले आहेस.

Old Photo Of Somy Ali And Salman Khan

त्या सर्व अभिनेत्रींना लाज वाटली पाहिजे, ज्या स्त्रियांना मारहाण करणाऱ्या या माणसाची साथ देतात. तसेच पुरूष अभिनेत्यांना देखील लाज वाटली पाहिजे, जे अशा माणसासोबत आहेत. आता ही युद्धाची वेळ आहे. तसेच तिने या पोस्टमध्ये महेश भट, नीना गुप्ता, पूजा भट, तारण आदर्श यांच्या नावाचे हॅशटॅग वापरले आहेत.

सलमान खानविषयी सोमीने केलेली ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. परंतु सोमीने ही पोस्ट डिलीट केली आहे. पोस्ट डिलिट करण्याचे कारण काय आहे हे सोमीच सांगू शकेल. सोमीच्या या पोस्टने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

Somy Ali Instagram Post with she deleted

सोमी अलीने यापूर्वीही अनेकदा सलमानवर निशाणा साधला आहे. ती नेहमीच सलमानवर असे गंभीर आरोप करत असते. सलमान खान आणि सोमी अली बरेच दिवस एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. सोमीने एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि सलमानच्या ब्रेकअपचे कारण सांगितले होते. सलमान तिला चिट करत होता म्हणून तिने सलमानसोबतचे नाते संपवले असे ती म्हणाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT