shruti twitter
मनोरंजन बातम्या

Actress Shruti Haasan on marriage : अभिनेत्री श्रुती हसन का आहे सिंगल

अभिनेत्री श्रुती हसननं नाही बांधली लग्नगाठ : लग्नाबाबतच्या प्रश्नांवर श्रुतीची भन्नाट उत्तरे ?

Sneha Dhavale

बॉलीवूडचे कलाकार आणि फॅन्सचे कनेक्शन काही वेगळंच असतं. फॅन्स आपल्या आवडत्या कलाकारांच्या बाबतीच नेहमीच उत्सुक असतात. आपले आवडते कलाकार काय करतात, काय खातात, सकाळी उठल्यावर त्यांची दिनचर्या काय असते. फिटनेससाठी हे कोणता व्यायाम करतात. त्यांच्या डायट फ्लॅन काय आहे. कोणतं परफ्युम वापरतात. यासारख्या प्रश्नांपासून आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यात काय चाललंय. यावर फॅन्सचं लक्ष असतं.

या फॅन्सना आणखी एका गोष्टीची उत्सुकता असते बरं का . ती म्हणजे आपला आवडता कलाकार लग्न कधी करणार याची. आणि आता तर सोशल मीडियासारखा प्लॅटफॉर्म आहेच. त्यात सेलिब्रिटीजसुद्धा आपल्या फॅन्ससोबत संवाद साधण्यासाठी कमालीचे उत्सूक असतात. आपल्या व्यस्त दैनंदिनीतून थोडासा वेळ बाजूला काढत चाहत्यांसोबत लाईव्ह सेशनच्या माध्यामातून आवर्जून ते चर्चा करतात. बॉलीवूडही अभिनेत्री श्रुती हसनसुद्धा आपल्या सगळ्या फॅन्सशी नेहमी संवाद साधते. सोशल मीडियावरही सतत ऍक्टीव्ह असते.

नुकतंच, श्रुती हसननं आपल्या फॅन्ससोबत आस्क मी एनिथिंग हे सेशन केले. या सेशनमध्ये चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मनसोक्त उत्तरं श्रुतीने दिली. या लाईव्ह सेशनमध्ये एका चाहत्यानं श्रुतीला अद्याप न लग्न का केले नाही. अविवाहित का राहिलीस याचे कारण विचारले. या प्रश्नाचे उत्तर श्रुतीनं अतिशय हटके अंदाजात दिलं. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात माणसाचे डोळे आणि ओठ भलेमोठे दिसतात.

श्रुतीनं आधीही असे अनेक लाईव्ह सेशन्स केलेत. आणि जेव्हा जेव्हा फॅन्सनं तिला लव्ह, लग्न, रिलेशनशीप स्टेटसबद्दल विचारलं आहे तेव्हा श्रुतीनं अशा प्रश्नांची उत्तरे अतिशय वेगळ्या ढंगात दिली आहेत. आपण आपलं काम अतिशय मनापासून करत असून आपलं आयुष्य मजेत जगतो आहोत, असं मात्र श्रुतीनं आवर्जून सांगितलंय. हो पण लग्नाचा विषय निघताच आपल्या अंगावर काटा येतो हेही ती मान्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT