Sai Tamhankar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar: मराठी सिनेसृष्टीतील बिकीनी गर्लचा 'बस बाई बस' या कार्यक्रमात जलवा

'बस बाई बस' या कार्यक्रमात अभिनेत्री सई ताम्हणकर सहभागी झाली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'बस बाई बस'(Bus Bai Bus) या कार्यक्रमात सूत्रसंचालक सुबोध भावे त्याच्या प्रत्येक भागात नेहमी वेगवेगळ्या अभिनेत्रींना आमंत्रित करत असतो. ९ सप्टेंबर अर्थात शुक्रवारी या कार्यक्रमाचा आणखी एक भाग प्रसारित झाला आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात मराठीच नाही तर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर(Sai Tamhankar) सहभागी झाली होती. सईने आपल्या अभिनयाने आणि वैविध्यपूर्ण भूमिकेने आपल्या चाहत्यांचे मन जिंकले आहे. या कार्यक्रमातही सहभागी होऊन तिने या कार्यक्रमात खूप धमाल मस्ती केली आहे.

सईने शुक्रवारी 'झी मराठी'वरील 'बस बाई बस' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिच्या येण्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. नेहमीच सुबोध आलेल्या कलाकारांना बुचकळ्यात पडणारे अनेक प्रश्न विचारतो. सुबोध सईला काही बुचकळ्यात पडणारे प्रश्न विचारतो. त्यातच सईला गणितासंदर्भातील प्रश्न विचारल्याने आणखी चिंतेत पडते, यावरून सईचा आणि गणिताचा छत्तीसचा आकडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी सुबोध भावे सईला बॉईस होस्टेला कधी गेली आहेस का? असे विचारतो यावर सई बोलते, 'बॉईज हॉस्टेलला नाही गेले पण बॉईज टॉयलेटमध्ये गेले आहे'.

यावेळी सईने अनेक आपल्या गंमतीदार किस्से शेअर केले आहेत. त्यात तिला एकदा माकड चावला असल्याचे ही तिने सांगितले. त्यावेळी तिच्या त्या वाक्यावर चांगलाच हशा पिकला. सई यावेळी 'परमं सुंदरी', 'बाई वाड्यावर या' अशा अनेक गाण्यांवरही थिरकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT