Sai Tamhankar Bought New Luxury Car Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sai Tamhankar Bought Luxury Car: सई ताम्हणकरसाठी २०२४ हे वर्ष ठरलं खास, गुढी पाडव्याचा मुहूर्तावर अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार

Sai Tamhankar: गेल्या वर्षी सईने नवं घर खरेदी केलं, यावर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर तिने थेट नवी कोरी अलिशान कारच खरेदी केली. नवी कोरी कार खरेदी केल्याचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला.

Chetan Bodke

Sai Tamhankar Bought New Luxury Car

खऱ्या अर्थाने, अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्यासाठी २०२४ हे वर्ष खास ठरलं आहे. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सई कधी मराठी चित्रपटामुळे तर कधी बॉलिवूड चित्रपटांमुळे ती चर्चेत राहिली आहे. गेल्या वर्षी सईने नवं घर खरेदी केलं, या वर्षी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर तिने थेट नवी कोरी अलिशान कारच खरेदी केली. नवी कोरी कार खरेदी केल्याचा व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला आहे. (Marathi Actress)

सई ताम्हणकर मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक दमदार अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये दबदबा निर्माण केला आहे. जिद्द आणि चिकाटी कायम ठेवत काम केलं की स्वप्न नेहमीच पूर्ण होतात, असंच काहीसं सईनेही केली आहे. सईने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मर्सिडीज बेंझ ही नवीकोरी गाडी खरेदी केली आहे. यावेळी अभिनेत्रीचे कुटुंबीय आणि आईही उपस्थित होती. लेकीचा आनंद पाहून आई देखील भारावून गेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. (Gudi Padwa)

“तुम्ही काय करू शकता किंवा काय करू शकत नाही हे कोणालाही सांगू नका. स्वप्न पाहा, ते साध्य करा अन् ते स्वप्न जगा!” असं कॅप्शन देत सईने नवी कार खरेदी करतानाचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. अभिनेत्रीने कार खरेदी करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताच तिच्या सेलिब्रिटी मित्रांनी आणि फॅन्सने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सईच्या कामाबद्दल सांगायचे तर, "श्री देवी प्रसन्न" , "भक्षक", "डब्बा कार्टल ", "अग्नी ", "ग्राउंड झिरो " २०२४ मध्ये रिलीज झालेल्या ह्या चित्रपटांमध्ये सई ताम्हणकर मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा, मशीन आणि औषधं जप्त

Winter Skin Care : हिवाळ्यातील जादुई फेसपॅक, रोज चमकेल त्वचा

Accident: बॅरियरला धडकत कार उड्डाणपूलावरून खाली कोसळली; शबरीमालाला जाणाऱ्या ४ जणांचा जागीच मृत्यू

Lasun Chutney: रोज वरण भात खाऊन कंटाळलात? मग गरमा गरम भाकरीसोबत करा लसणाच्या स्पेशल चटणीचा बेत

खरे 'ही मॅन', ते कायम आठवणीत राहतील; धर्मेंद्र यांच्या निधनानंर सचिन पिळगावकरांची भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT