Ridhima Pandit Saam tv
मनोरंजन बातम्या

Ridhima Pandit: शुभमन गिलसोबत लग्नाच्या चर्चा, मराठी अभिनेत्रीनं सांगितलं नेमकं खरं काय?

Ridhima Pandit: अभिनेत्री रिधिमा पंडित गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिलसोबतच्या अफेअर आणि लग्नाच्या अफवांमुळे चर्चेत होती. आता या अभिनेत्रीने यावर मत व्यक्त केलं आहे.

Shruti Vilas Kadam

अभिनेत्री रिधिमा पंडित गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिलसोबतच्या अफेअर आणि लग्नाच्या अफवांमुळे चर्चेत होती. सोशल मीडियावर “रिधिमा आणि शुबमन लवकरच लग्न करणार आहेत” अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र अखेर या सर्व चर्चांवर रिधिमाने मौन सोडत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

'हिंदी रश'ला दिलेल्या मुलाखतीत रिधिमाने सांगितले, “मी खूपच आश्चर्यचकित झाले होते. अचानक माझं नाव एका क्रिकेटरसह जोडण्यात आलं. लोक म्हणत होते की मी शुबमन गिलशी लग्न करणार आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. मी त्याला कधीच भेटले नाही. तो एक क्रिकेटर आहे ज्याला मी ओळखतही नाही. मी त्याला फक्त एका इव्हेंटमध्ये दूरून पाहिलं होतं, पण आमच्यात कोणताही संवाद झाला नाही.”

या अफवांमुळे तिच्या कुटुंबालाही मानसिक त्रास झाला, असं ती पुढे म्हणाली. “माझ्या घरच्यांनी बातम्या पाहिल्या आणि त्यांना सुद्धा धक्‍का बसला. माझ्या आईने विचारलं, ‘हे काय चाललं आहे?’ अशा गोष्टी ऐकून कुणालाही वाईट वाटेलच. लोकांना काहीतरी लिहायचं असतं आणि त्यातून कोणाचंही नाव जोडतात. हे फारच दुर्दैवी आहे.”

रिधिमाने सांगितले की, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोक खोटी माहिती पसरवतात. “काही लोक म्हणाले की मीच हे मुद्दाम सुरू केल्या प्रसिद्धीसाठी. पण मला प्रसिद्धीसाठी अशा अफवांची गरज नाही. मी माझ्या कामातून ओळख मिळवली आहे आणि त्याचाच मला अभिमान आहे.कृपया अफवा पसरवू नका. मला आणि माझ्या कुटुंबाला शांततेत राहू द्या,” असं म्हणत तिने या चर्चांना पूर्णविराम दिला.

रिधिमा पंडित ‘बहू हमारी रजनीकांत’, ‘खतरा खतरा खतरा’ आणि ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाड़ी’ सारख्या लोकप्रिय शोमधून प्रेक्षकांच्या घरात पोहोचली आहे. सध्या ती काही वेब प्रोजेक्ट्स आणि रिअॅलिटी शोजच्या चर्चेत असून, लवकरच नव्या प्रोजेक्टमधून ती पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Australia vs England, 1st Test : कसोटीत १०४ वर्षांनी चमत्कार, दुसऱ्याच दिवशी तगड्या इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून सुपडासाफ

Curd in winter: हिवाळ्यात दही खाताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Maharashtra Live News Update: अमित साटम यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

शिक्षणासाठी घरातून पळाली अन् रेड लाइट एरियात अडकली; तिथून निसटली, पण शेतात काढावी लागली अख्खी रात्र

Local Body Election: शिर्डीत अपक्ष महिला उमेदवाराला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण

SCROLL FOR NEXT