Raveena Tandon Unveils Shri Ravi Tandon Chowk Instagram/ @officialraveenatandon
मनोरंजन बातम्या

Ravi Tandon Chowk Unveils: मुंबईतल्या ‘या’ रस्त्याला रवीना टंडनच्या वडिलांचं नाव, अभिनेत्रीच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

Ravi Tandon Chowk: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि प्रख्यात चित्रपट निर्माते रवी टंडन यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सिनेसृष्टीमध्ये दिलेल्या अमुल्य योगदानामुळे मुंबईच्या जुहूतील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

Chetan Bodke

Raveena Tandon Unveils Shri Ravi Tandon Chowk

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे (Raveena Tandon) वडील आणि प्रख्यात चित्रपट निर्माते रवी टंडन यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सिनेसृष्टीमध्ये दिलेल्या अमुल्य योगदानामुळे मुंबईच्या जुहूतील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त चौकाच्या बोर्डाच्या फलकाचे उद्घाटन रवी टंडन यांच्या पत्नी वीणा टंडन यांच्या हस्ते करण्यात आले. नुकतेच रवीनाने याबद्दलची इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. (Bollywood)

टंडन कुटुंबीयांसाठी हा फार अभिमानाचा क्षण आहे. हा अभिमानाचा क्षण रवीनाने इन्स्टग्रामवर शेअर केला आहे. रवी टंडन चौकाच्या उद्घाटन सोहळ्याला रवीना, आई वीणा आणि मुलगी राशा यांच्यासोबत अनेक कुटुंबीय उपस्थित होते. रवीनाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यांच्या अमुल्य योगदानाची चाहत्यांमध्ये पुन्हा जोरदार चर्चा होत आहे. (Film Director)

या व्हिडीओवर चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनी रवी टंडन यांच्या कामाचे कौतुक केले आहे. “हॅप्पी बर्थडे पप्पा, रवी टंडन चौक १७ फेब्रुवारी २०२४. पप्पा रोज तुमची आठवण येते.” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने काही व्हिडीओ आणि फोटो शेअर केले. (Bollywood News)

प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक रवी टंडन यांची १७ फेब्रुवारीला जयंती असते. टंडन कुटुंबीयांसहित चाहत्यांनी त्यांची ८८वी जयंती साजरी केली. रवी टंडन यांचा ११ फेब्रुवारी २०२२ रोजी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं होते. रवी यांनी आपल्या सिनेकारकिर्दित 'नजराना', 'खेल-खेल में', 'मजबूर', 'अनहोनी' सह अनेक दमदार चित्रपट हिंदी सिनेसृष्टीला दिले. रवी यांच्या जयंतीनिमित्त रवीना टंडन आणि राशा थडानीने दिव्यांगांना व्हिलचेअर भेट देत खास अंदाजात जयंती साजरी केली. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT