Rashmika Mandanna Instagram@RashmikaMandanna
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna: नॅशनल क्रश रश्मिका मंदाना ट्रोलर्समुळं प्रचंड दुखावली होती, आता म्हणते....

कांतारा चित्रपट पाहिला नसल्याने चाहते रश्मिकावर नाराज होते. तसेच तिला ट्रोल देखील करत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rashmika Mandanna Get Brutally Trolled: अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला भारताची नॅशनल क्रश असे म्हटले जाते. अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी एक भावनिक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये तिने ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला होता. रश्मिकाला काही दिवसांपासून, काही आठवड्यांपासून किंवा काही वर्षांपासून ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे, असे तिने पोस्टमध्ये म्हटले होते. अखेर रश्मिकाने यावर बोलण्याचा निर्णय घेतला. तिला त्रासदायक वाटणाऱ्या गोष्टी तिने इंस्टाग्राम पोस्टचा माध्यमातून व्यक्त केल्या.

रश्मिकाने इंस्टाग्रामवर नुकतीच एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये तिने तिला साथ दिल्याबद्दल तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. स्वतःचा एक हसतमुख फोटो शेअर करत रश्मिकाने लिहिले आहे, “ज्यांना माझ्या प्रेमाची गरज आहे त्यांना प्रेम पाठवत आहे. मी बऱ्याच पोस्ट पाहिल्या तसेच मला भरपूर मेसेजेस सुद्धा आले, तुमच्या या प्रेमाने मी भारावून गेले आहे. तुम्ही दिलेल्या या प्रेमामुळे मला खूप बरे वाटले. धन्यवाद. खूप प्रेम.” (Social Media)

'मी माझ्या करिअरला सुरुवात केल्यापासून मला खूप द्वेषाला सामोरे जावे लागले आहे. बर्‍याच ट्रोलर्स आणि नकारात्मकतेसाठी अक्षरशः मी एक पंचिंग बॅग झाले आहे. मला माहित आहे की, मी निवडलेल्या क्षेत्रात किंमत ही मोजावी लागते. मला माहित आहे मी सगळ्यांच्या आवडती नाही होऊ शकत आणि निश्चित प्रत्येक व्यक्तीकडून मला अशी अपेक्षा नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही मला काहीही बोलाल आणि त्याऐवजी नकारात्मकता स्प्रेड कराल”, असे रश्मिकाने पोस्टमध्ये म्हटले होते. (Rashmika Mandanna)

Rashmika Mandanna Instagram Story

कांतारा चित्रपट पाहिला नसल्याने चाहते रश्मिकावर नाराज होते. तसेच तिला ट्रोल देखील करत होते. कांतारा चित्रपटाचे दिग्दर्शक ऋषभनेच रश्मिकाला 2016 मध्ये किरिक पार्टी या चित्रपटाद्वारे लॉन्च केले होते. चाहत्यांनी असे म्हणणे आहे की, यशाची हवा ओक्यात गेल्याने ‘नॅशनल क्रश’ ‘तिची मुळं विसरली’ आहे. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : नगर-पुण्यानंतर कल्याणमध्ये बिबट्याची दहशत, कुत्रे-जनावारांवर हल्ला, नागरिकांसमोर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Live News Update : राष्ट्रीय पातळीवरील 38 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा पुढे ढकलली

Kitchen Cleaning Hacks : किचनमधील मळकट भांड्यांना पुन्हा नवीन चमक द्या, आताच ट्राय करा घरगुती उपाय

Priyanka Chopra : पिवळी साडी, हातात बंदूक अन् पायात कोल्हापूरी; देसी गर्ल महेशबाबूसोबत करणार ॲक्शन

Milk Malai Benefits For Skin: दुधाची साय चेहऱ्याला लावा, कोरडी त्वचा होईल मऊ अन् मुलायम

SCROLL FOR NEXT