Rakul Preet Singh Brother Arrested 
मनोरंजन बातम्या

Rakul Preet Singh Brother Arrested: अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक; १९९ ग्रॅम कोकेन जप्त

Rakul Preet Singh Brother Arrested: बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा भाऊ अमनप्रीत सिंगचे नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले आहे. ड्रग्जचे सेवन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय.

Bharat Jadhav

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा भाऊ अमनप्रीतला ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलीय. तेलंगणा अँटी नार्कोटिक्स ब्युरो (TGANB) ने नरसिंगी पोलीस (सायबराबाद) सोबत हैदरशाहकोटमधील एका फ्लॅटवर छापा टाकला. या फ्लॅटमधून १९९ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. या ड्रग्सची त्याची किंमत ३५ लाख रुपये आहे. कोकेन जप्त करण्यासोबतच ५ ड्रग्ज विक्रेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलंय.

या कारवाईनंतर पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, याप्रकरणाशी संबंधीत ५ ड्रग्ज डिलर आणि ड्रग्ज सेवन करणारे ३० जणांना अटक करण्यात आलीय. अमनप्रीत देखील ड्रग्जचं सेवन करत होता. ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलीय. अशा ३० जणांच्या यादीत पोलिसांनी त्याचे नाव समाविष्ट केलंय. आता पोलीस लवकरच या ५ ड्रग्ज विक्रेते आणि ३० ड्रग्ज वापरणाऱ्यांना न्यायालयात हजर करणार आहेत.

या प्रकरणात काही भारतीय आणि नायजेरियन लोकांचा समावेश आहे. या आरोपींच्या संपर्कात अमनप्रीत कधी आला. याचा तपास अद्याप झालेला नाहीये. आता या ३० ग्राहकांची नावे सायबराबाद आयुक्तांना पुढील तपासासाठी देण्यात आलीत, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. अमली पदार्थांच्या प्रकरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात रकुलला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काही दिवसांपूर्वी समन्स बजावले होते.

अशा स्थितीत या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का, असा प्रश्न पोलिसांना विचारण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, “त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, आम्ही त्याची चौकशी करत नाही, त्यामुळे त्याचे नाव विनाकारण ओढण्याची गरज नसल्याचे पोलिसांनी सांगितलंय. दरम्यान रकूल प्रीत हिने जॉकी भगनानीशी लग्न केलंय. चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २१ फेब्रुवारीला रकुल प्रीत सिंग आणि जॉकी भगनानी यांनी लग्नाची गाठ बांधलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT