Priya Bapat And Umesh Kamat Romantic Photo Instagram
मनोरंजन बातम्या

Priya Bapat And Umesh Kamat Photo: ‘सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त करणं भयंकर...’ प्रिया बापटने नवऱ्याला किस करताच नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स...

Priya Bapat And Umesh Kamat News: सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या या क्यूट कपलने नुकतेच चाहत्यांसोबत काही रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

Chetan Bodke

Priya Bapat And Umesh Kamat Romantic Photo

मराठी इंडस्ट्रीतलं सुप्रसिद्ध कपल म्हणून प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्याकडे पाहिलं जातं. रियल लाईफमध्येच नाही तर, रिल लाईफमध्येही ही जोडी अनेकदा एकमेकांचे लाईफ पार्टनरच्या भूमिकेतही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकतंच ही जोडी ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या या क्यूट कपलने नुकतेच चाहत्यांसोबत काही रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.

काही वेळापूर्वी प्रिया बापटने सोशल मीडियावर उमेशला गालावर किस करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या शेअर केलेल्या पोस्टला तिने कॅप्शन दिले की, “सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं मला भयंकर आवडतं...तळटीप- खूप आवडीच्या गोष्टीला “भयंकर आवडणे” ही उपमा माझी काकू द्यायची. “भयंकर” या शब्दाचा असाही वापर”

अभिनेत्रीच्या या पोस्टवर फक्त चाहत्यांनीच नाही तर काही सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिली आहे. उमेश आणि प्रियाच्या फोटोवर एका युजरने मेड फॉर इच अदर अशी कमेंट केली आहे, तर काही युजरने, तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. तर आणखी एकाने मला तुमची जोडी प्रचंड आवडते, अशीही कमेंट केली आहे. आई ग... आजचा दिवस मस्त जाणार आहे, सकाळी सकाळी आवडत्या चेहेऱ्यांचे दर्शन झाले, तुम्हाला कोणाचीही नजर ना लागे... असं म्हणत एका युजरने त्यांच्या जोडीचे कौतुक केले आहे.

दरम्यान, प्रिया आणि उमेशही जोडी मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे. २०११ मध्ये दोघांनीही लग्नगाठ बांधली होती, लग्नाच्याआधी जवळपास ८ वर्ष एकत्र दोघेही एकमेकांना डेट करत होते. रुपेरी पडद्यावर जेवढी फेमस जोडी आहे तितकीच रियल लाईफमध्येही आहे. या दोघांनीही टाईमप्लीज आणि भेट या दोन्ही चित्रपटात एकत्र काम केले होते. नुकतंच ‘जर तर ची गोष्ट’ या नाटकातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले. या नाटकाला पहिल्याच प्रयोगाला दमदार प्रतिसाद मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT