Neena Gupta Birthday Instagram @neena_gupta
मनोरंजन बातम्या

HBD Neena Gupta : लग्नाआधी आई झालेल्या ६४ वर्षीय नीना गुप्तांचा कसा आहे जीवनप्रवास

Neena Gupta Birthday: नीनाने 1982 मध्ये 'गांधी' चित्रपटातून त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

Pooja Dange

Actress Neena Gupta : 4 जून 1959 रोजी दिल्लीत जन्मलेल्या नीना गुप्ता यांचा आज 64 वा वाढदिवस आहे. नीना गुप्ता यांनी बॉलिवूडमधील अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी 'पंचायत' या वेबसीरीजमध्ये मंजू देवीची भूमिका साकारून साऱ्यांची मने जिंकली आहेत. नीना या एक अशा अभिनेत्री आहेत ज्या व्यावसायिक तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत.

नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, कॉलेजमध्ये लोक त्यांना 'बॅड गर्ल' म्हणायचे. दुसरीकडे, वेस्ट इंडिजचा खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये असताना लग्नाआधी गरोदर राहिल्याने नीना चर्चेत होत्या. या दिग्गज अभिनेत्रीच्या खास दिवशी त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या पैलूंवर एक नजर टाकूया.

नीना गुप्ता यांचे वडील आरएन गुप्ता हे स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये अधिकारी होते. तर त्यांची आई शकुंतला देवी शिक्षिका होत्या. नीनाने त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली पूर्ण केले. त्यानंतर 1977 मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. (Latest Entertainment News)

नीना त्यांच्या बॅचच्या टॉपर होत्या. नीना यांच्या आई शकुंतला देवीची इच्छा होती की त्यांनी IS अधिकारी व्हावे, पण त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते.

नीनाने 1982 मध्ये 'गांधी' चित्रपटातून त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. या चित्रपटातील त्यांची भूमिका छोटी असली तरी त्यांच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'गांधी'नंतर नीना गुप्ता यांनी 'मंडी', 'रिहाई' आणि 'दृष्टी' या चित्रपटात काम केले. नीना मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही खूप सक्रिय होत्या.

नीना यांनी 'खानदान', 'यात्रा', 'भारत एक खोज', 'श्रीमान-श्रीमती' सारखे टीव्ही शो केले आहेत. नीना गुप्ता यांना खरी ओळख 'चोली के पीचे क्या है' या गाण्यातून मिळाली हे फार कमी लोकांना माहिती आहे.

नीना गुप्ता यांनी व्यावसायिक जीवनातील प्रत्येक अडचणीचा पराभव करत यशाचे शिखर गाठेल, परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी वाढतच गेल्या. नीना गुप्ता एकेकाळी वेस्ट इंडिजचा खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्सच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या.

जेव्हा वेस्ट इंडिजचा संघ भारतात क्रिकेटचे सामने खेळायला आला होता. दरम्यान, मुंबईत एका पार्टीत नीना यांची भेट व्हिव्हियन रिचर्ड्सशी झाली. दोघेही पहिल्याच भेटीत मित्र झाले आणि त्यानंतर पुढे त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली.

व्हिव्हियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता लिव्ह-इनमध्ये राहत होते. डेटिंगच्या काही वर्षांतच अभिनेत्री गर्भवती झाल्या. नीना यांनी 1989 मध्ये एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव मसाबा गुप्ता आहे. मसाबा ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे आणि नुकतेच तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

व्हिव्हियन आणि नीना त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर वेगळे झाले. त्यानंतर 2008 मध्ये विवेक मेहरा यांनी नीना गुप्ताशी लग्न केले. दोघेही त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहेत. तसेच वयाच्या ६४ व्या वर्षीही नीना चित्रपटांमध्ये सक्रिय असून एक उत्तम भूमिका साकारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT