Nayantara Husband Gifted Her Mercedes Benz Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nayantara New Gift: लेट पण थेट; नयनताराला पतीकडून मिळालं खास बर्थडे गिफ्ट, फोटो शेअर करत म्हणते...

Nayantara Birthday Gift: नयनताराच्या वाढदिवसानिमित्त पती विघ्नेशने तिला वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. सध्या तिच्या बर्थडे गिफ्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Nayantara Husband Gifted Her Mercedes Benz

किंग खानच्या ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई करत जगभरामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. चित्रपटामध्ये, शाहरुख खानसोबत नयनतारा सुद्धा प्रमुख भूमिकेत होती. तिच्या ह्या पहिल्याच बॉलिवूड चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

१८ नोव्हेंबर रोजी नयनताराचा ३९ वा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त पती विघ्नेशने तिला वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. सध्या तिच्या बर्थडे गिफ्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो शेअर केला आहे.

१८ नोव्हेंबर रोजी नयनताराचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या १० ते १२ दिवसानंतर पती विघ्नेश शिवनने पत्नी नयनताराला खास वाढदिवसाचे गिफ्ट दिले आहे. लेट पण थेट गिफ्ट मिळाल्यामुळे नयनतारा खूपच खुश झाली आहे. नयनताराच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त विघ्नेशने नयनताराला एक लक्झरियस मर्सिडीज बेंझ कार भेट दिली आहे. या काळ्या रंगाच्या आलिशान कारची मूळ किंमत जवळपास २.६९ कोटी रुपये इतकी आहे. तर टॉप मॉडेलची किंमत ३.४० कोटी रुपये इतकी आहे. नयनताराने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्या गिफ्ट्सचे फोटो शेअर केले आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना नयनताराने पहिल्या फोटोमध्ये, कारच्या लोगोचा फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये हार्टची डिझाईन करत लोगो दाखवला आहे. सोबतच पुढे पोस्टच्या माध्यमातून पती विघ्नेशचे आभारही तिने मानले आहे. ‘सुंदरी, तुझं घरात खूप स्वागत आहे. प्रिय पती विग्नेश तू दिलेल्या ह्या सुंदर गिफ्ट्ससाठी तुझे धन्यवाद, लव्ह यू.’ विघ्नेशने नयनताराला कोणती कार गिफ्ट दिली आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. नयनताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ‘जवान’नंतर ‘अन्नपूराणी’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT