बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला सर्वांनाच आपलं आरोग्य फीट ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. सेलिब्रिटी मंडळीही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी व्यायाम आणि डाएट फॉलो करत असतात. सर्वांचीच लाडकी मलायका अरोरा कायमच आपल्या फिटनेसमुळे आणि फॅशनमुळे चर्चेत असते. ती कायमच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच मलायकाने इन्स्टाग्रामवर जिममधील व्यायाम करत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल.
५० वर्षांची मलायका अरोरा इतकी सुंदर आणि फिट कशी? असा प्रश्न कायमच चाहत्यांना पडलेला असतो. तिचा फिटनेस अनेक तरुणींनाही मागे टाकतो. मलायका अनेकदा जिममध्ये जाताना स्पॉट होते. पण त्याचवेळी ती योगासनं सुद्धा करते. तिच्या फिटनेसच रहस्य त्यामध्ये दडलेलं आहे. अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलेला आहे, त्यामध्ये ती वेगवेगळे योगासनं करताना दिसत आहे. चपळ आणि लवचित शरीर ठेवण्यासाठी ती कोणकोणते योगासनं करते, हे आपल्याला व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल. नियमित योगासनं केल्यामुळे शरीराचं वजन नियंत्रणात राहते आणि ग्लोईंग स्किन कायम राहते.
मीडिया रिपोर्टनुसार, मलायका दररोज सकाळी नाश्त्यामध्ये ताजी फळं, इडली, उपमा किंवा मल्टीग्रेन टोस्टसोबत उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग खाते. तर संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये मलायका फ्रेश फ्रुट ज्युस, उकडलेल्या अंड्याचा पांढरा भाग आणि ब्राऊन ब्रेड टोस्ट खाते.
तर दुपारच्या जेवणात ती २ रोट्या, भात, भाज्या, चिकन आणि स्प्राउट्स खाते. रात्रीचं जेवण हलके ठेवण्यासाठी मलायका रात्री वाफवलेल्या भाज्यांसोबत सॅलड आणि सूप घेते. तिचा हा सर्व आहार अगदी हलक्या प्रमाणात असतो. त्यामुळे ती कायमच फीट राहण्याचा प्रयत्न करते.
सध्या मलायकाची ही इन्स्टा पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तिच्या फिटनेसचे चाहते कौतुक करीत आहेत. १ लाखांहून अधिक लाईक्स व्हिडीओला मिळाले असून २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.