Kranti Redkar Recieved Threat Saam TV
मनोरंजन बातम्या

Kranti Redkar Got Threat: अभिनेत्री क्रांती रेडकरला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार नोंद

Kranti Redkar Got Threat from Pakistan: एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री कांती रेडेकरला पाकिस्तानून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

Kranti Redkar Latest News:

एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पत्नी, अभिनेत्री कांती रेडेकरला पाकिस्तानून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. क्रांतीला पाकिस्तानी क्रमांकावरून अश्लील संदेश पाठवत जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर क्रांती रेडकरने गोरेगाव पोलीस ठाणे गाठत अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंद केलीआहे. (Latest Marathi News)

क्रांती रेडकरला ६ मार्चला व्हॉट्सअॅपवरून अश्लील भाषेत वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून धमकी मिळाली. त्यानंतर क्रांती रेडकरने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंद केली. तिने ब्रिटन आणि पाकिस्तानी क्रमांकावरून धमकी मिळाली आहे.

क्रांती रेडकरला या आधी देखील जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी जूनमध्ये क्रांतीला धमकी मिळाली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी मिळाली होती. तेव्हा क्रांती रेडकरने तिच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली होती.

क्रांती रेडकर प्रसिद्ध अभिनेत्री आहे. क्रांती रेडकर अभिनयासोबत दिग्दर्शक देखील आहे. क्रांतीने 'सून आस्वी आशि' मराठी सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. क्रांती रेडकला जुळ्या मुली आहेत.

दरम्यान, क्रांती रेडकरचे पती एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे दोन वर्षापूर्वी प्रचंड होते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स क्रुझ प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर चर्चेत आले होते.

बॉलीवूडमध्ये क्रांतीने केलं काम

क्रांती रेडकर २००३ साली प्रकाश झाच्या 'गंगाजल' सिनेमात दिसली होती. २०१४ मध्ये क्रांतीने दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे. २०१४ साली क्रांतीने 'काकन' सिनेमा केला. त्यावेळी क्रांतीच्या सिनेमाचं भरपूर कौतुक झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganeshotsav 2026 : गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्र भक्तिमय, मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

Maharashtra News Live Update: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

konkan Fort : घोड्याच्या नालासारखा आकार असलेला किल्ला, रचना पाहून व्हाल थक्क!

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

Crime: मार्केटमधून घराकडे निघालेल्या महिलेसोबत भयंकर घडलं, भररस्त्यात पोलिसाने छेड काढली नंतर...

SCROLL FOR NEXT