Kashmera Shah Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Kashmera Shah: लॉस एंजिल्समध्ये कश्मीरा शाहचा अपघात झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कश्मीराने माहिती दिली आहे.

Manasvi Choudhary

लॉस एंजिल्समध्ये कश्मीरा शाहचा अपघात झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कश्मीराने माहिती दिली आहे. तिने गंभीर अपघातातून बचावल्यानंतर देवाचे आभार देखील मानले आहे. सोशल मीडियावर आता कश्मीराचे चाहते चिंतेत पडले आहेत. कश्मीरा शाहचा अपघात नेमका कसा झाला आहे याबद्दलची माहिती अद्याप कळली नाही.

नुकतंच कश्मीराने सोशल मीडियावर तिचा गंभीर अपघात झाल्याची माहिती दिली आहे. संपूर्ण रक्तबंबाळ झालेले कपड्याचे फोटो तिने शेअर केले आहेत. यावरून हा अपघात किती मोठा झाला आहे हे लक्षात येते. सोशल मीडियावर सेलिब्रिटीसह चाहते तिच्या तब्येतीची विचारपूस करत आहे.

अपघाताचे फोटो शेअर करताना कश्मीराने म्हटलं आहे की,'मला वाचवण्यासाठी परमेश्वर तुझे आभार. खूप भयानक घटना होती. काही तरी मोठं होणार होतं पण थोडक्यात बचावलं आहे. अपेक्षा आहे की, जखमांचे व्रण राहणार नाहीत. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. परत येण्याची प्रतिक्षा केली जाऊ शकत नाही. असं म्हटलं आहे. पुढे तिने, आज मला माझी फॅमिलीची खूप आठवण येत आहे. कृष्णा अभिषेक सोबत तिने दोन्ही मुलांची तिला खूप आठवण येत असल्याचं तिनं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वीच कश्मीरा पती कृष्णा अभिषेक आणि दोन्ही मुलांसह संपूर्ण परिवारासह लॉस एंजेलिस शहरामध्ये होती. नंतर ७ नोव्हेंबरला कृष्णा मुलांना घेऊन मुंबईत आला. कश्मिरा कामानिमित्त आली नव्हती. अशातच आता कश्मीराचा अपघात झाला आहे. कश्मिराने ही माहिती दिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT