Kangana Ranaut Reaction Annu Kapoor Comment Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut News : "कंगनाजी कोण आहेत? ती खूप सुंदर आहे का ?"; अन्नू कपूर यांच्या वक्तव्यावर कंगना रणौतचं जोरदार प्रत्युत्तर

Kangana Ranaut Reaction Annu Kapoor Comment : काही दिवसांपुर्वी एका CISF महिला कॉन्स्टेबलने कंगना रणौतच्या कानशिलात दिली होती. या प्रकरणावर अन्नू कपूर यांनी कंगनाच्या प्रसिद्धीवर भाष्य केलं होतं. आता खुद्द अभिनेत्रीने भाष्य केले आहे.

Chetan Bodke

'हमारे बारह' या चित्रपटामुळे बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर सध्या कमालीचे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट 'नेटफ्लिक्स' ओटीटीवर रिलीज झालेला आहे. सध्या चित्रपटाची टीम प्रमोशननिमित्त व्यग्र आहे. अन्नू कपूर यांना चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कंगना रणौतच्या 'थप्पड' प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी "कंगना कोण आहे ? त्यांच्याविषयी कोणी सांगेल का ? साहजिक आहे विचारत आहे म्हणजे, ती कोणी मोठी अभिनेत्री असेल. ती खूप सुंदर आहे का ?" असे उत्तर दिले होते. आता या सर्व प्रकरणावर खुद्द अभिनेत्रीने उत्तर दिलेले आहे.

कंगना रणौतने इन्स्टा स्टोरी शेअर करत अभिनेता अन्नू मलिकला उत्तर दिलेले आहे. ती म्हणते, "तुम्ही अन्नू कपूर यांच्या विधानाशी सहमत आहात का, की आपण एका यशस्वी महिलेचा तिरस्कार करतो. जर ती सुंदर असेल तर तिचा जास्त तिरस्कार करतो आणि जर ती शक्तिशाली असेल तर तिचा खूपच तिरस्कार करतो? खरं आहे का?" असा प्रश्न विचारत कंगनाने अन्नू कपूरला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. कंगना रणौतचं हे विधान सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Kangana Ranaut And Annu Kapoor News

चंदीगढ विमानतळावर कंगना रणौतच्या कानाखाली देणाऱ्या महिला सुरक्षा रक्षक कुलविंदर कौरविरोधात घटनेनंतर लगेचच गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावेळी कंगना रनौतने "दिल्लीत शेतकरी 100-200 रुपये घेऊन आंदोलनाला बसले आहेत." असं वक्तव्य केलं होतं. या आंदोलनात कुलविंदर कौरचीही आई होती. म्हणून कुलविंदरच्या मनात कंगनाच्या या वक्तव्याचा संताप होता. घटनेबद्दल अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिलेली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT