Janhvi Kapoor Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

जान्हवी कपूरने न विचारताच केली ही गोष्ट, म्हणाली, आता काही गडबड...

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी चित्रपट 'गुड लक जेरी' मुळे खूप चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे काही पोस्टर समोर आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) सध्या तिच्या आगामी चित्रपट 'गुड लक जेरी'(Good Luck Jeery) मुळे खूप चर्चेत आहे. नुकतेच या चित्रपटाचे काही पोस्टर समोर आले होते. ज्यामध्ये जान्हवी वेगवेगळ्या लूकमध्ये दिसली होती. आता तिने या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहेत. पण हे नवीन पोस्टर शेअर करताना तिने हेही सांगितले की, कुणाला न विचारता तिने हे पोस्टर शेअर केले आहेत.

काही वेळापूर्वीच, जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'गुड लक जेरी' या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करून, 'माझ्या बिजनेस पार्टनर्सना भेटा... न विचारता तुम्हाला हा फोटो दाखवला आहे. आता काही गडबड व्हायला नको. 'गुड लक' नाही बोलणार?' असे कॅप्शन लिहिले आहे. जान्हवीने हटके अंदाजात पोस्ट केलेला हा पोस्टर नेटकऱ्यांना खूप आवडला असून, जान्हवीने लिहिलेल्या कॅप्शनसाठी यूजर्स तिचे कौतुक करत आहेत.

'गुंजन सक्सेना'नंतर जान्हवी 'गुड लक जेरी'मध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट २९ जुलै २०२२ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याआधी जान्हवीने चित्रपटाचे दोन पोस्टर शेअर केले होते. पहिल्या पोस्टरमध्ये जान्हवी घाबरून हातात बंदूक घेऊन उभी होती. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये जान्हवी एका पेटीच्या मागे लपली होती. तर तिच्यासमोर असलेल्या एका डब्यात मॅगी आणि दुसऱ्या डब्यात मोमोज ठेवले होते.

जसे चित्रपटाचे पहिले दोन पोस्टर खूपच मनोरंजक होते, त्याचप्रमाणे चित्रपटाचा तिसरा आणि नवीन पोस्टर देखील खूप रंजक आहे. ज्यामध्ये जान्हवीसोबत अनेक कलाकार दिसत आहेत. या पोस्टरमध्ये जान्हवी सगळ्यांच्यामध्ये घाबरलेली बसली आहे आणि इतर सर्व कलाकार तिच्याकडे एकटक पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

Dussehra Apatya Leaves: दसऱ्याला आपट्याची पाने वाटण्यामागे शास्त्र काय आहे?

Kalsubai Fort History: इतिहास, वास्तुकला आणि ट्रेकिंगसाठी खास! वाचा कळसुबाई किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

America Shutdown: ट्रम्प यांना जोरदार धक्का; अमेरिकेत शटडाऊन, सरकारी काम ठप्प, पगारावरही संकट

SCROLL FOR NEXT