Gauhar Khan Baby Bump Instagram @gauaharkhan
मनोरंजन बातम्या

Gauhar Khan Baby Bump: कुणी येणार गं! गौहर खानने फ्लॉन्ट केले बेबी बंप, फोटो होतायेत व्हायरल

Gauhar Khan New Photo: गौहर खान वयाच्या 39 व्या वर्षी पहिल्यांदाच आई होणार आहे.

Pooja Dange

Gauhar Khan Flaunts Her Baby Bump: बॉलिवूड आणि टीव्ही जगतात आपल्या टॅलेंटने सर्वांना प्रभावित करणारी अभिनेत्री गौहर खान सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंचे चाहते कौतुक करत आहेत.

गेल्या काही काळापासून गरोदरपणामुळे चर्चेत असलेली गौहर लवकरच बाळा जन्म देईल. गौहर खान सोशल मीडियावर चर्चेत असतेच. नुकतेच तिने तिचे लेटेस्ट फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी अभिनेत्री मल्टीकलर गाऊनमध्ये दिसत आहे. (Latest Entertainment News)

गौहर वेगवेगळ्या पोझमध्ये बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. अभिनेत्रीने फोटोसोबत गर्भवती महिलेचे स्टिकर आणि हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.

गौहर खान आई होण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहे. ही अभिनेत्री वयाच्या 39 व्या वर्षी पहिल्यांदाच आई होणार आहे. कोरोनाच्या काळात तिने 2020 मध्ये संगीतकार स्माईल दरबार यांचा मुलगा झैद दरबारशी लग्न केले.

दोघांची पहिली भेट एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये झाली होती. काही काळ भेटल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आता ती आई होणार आहे आणि हे जोडपे या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे.

गौहर खान अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी टीव्ही, फिल्म आणि ओटीटी या तिन्ही मोठ्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे. ती खूप प्रतिभावान आहेत. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत.

ती शेवटची 2021 मध्ये 14 फेरे या चित्रपटात दिसली होती. याशिवाय ती बिग बॉस 14 मध्ये दोन आठवडे दिसली होती. याशिवाय अभिनेत्री तांडव आणि सॉल्ट सिटी सारख्या वेबसीरीजमध्ये झळकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: भारतात दिसणार पहिलं चंद्रग्रहण कधी? धार्मिक नियम आणि सूतक काळ जाणून घ्या

Maharashtra Live News Update : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम पालघरमध्ये शेतकऱ्यांनी रोखलं

खूशखबर! भारतात ई-पासपोर्ट लाँच; फी किती भरावी लागेल आणि अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये हफ्ता मिळणार, मंत्र्याचं मोठं विधान

Children diabetes risk: गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका; चुकीच्या आहाराच्या सवयी पालकांनी कशा बदलाव्या?

SCROLL FOR NEXT