Amir- Fatima Screen Sharing Together Rumors Instagram
मनोरंजन बातम्या

Amir- Fatima Screen Sharing Together Rumors: खरंच अमिर खान आणि फातिमा सना शेख पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर का?, अभिनेत्रीने जरा स्पष्टच सांगितलं...

Amir And Fatima News: सोशल मीडियावर हे दोघेही 'सीतारे जमीन पर'मध्ये एकत्र दिसणार आहेत, अशी चर्चा होती. यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Amir- Fatima Screen Sharing Together Rumors

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच आपल्या अभिनयामुळे चर्चेत असतो. अमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. चित्रपटाबद्दल अभिनेत्याच्या खूप अपेक्षा होत्या, पण तसं काही झालं नाही.

दरम्यान ‘लाल सिंग चड्ढा’नंतर अमिर खानने अभिनयातून ब्रेक घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अमिरकडे अनेक चित्रपट आहेत. नुकतंच आमिर खान आणि ‘दंगल’ फेम फातिमा सना शेखसोबत दिसणार आहे, अशी चर्चा होत आहे. यावर आता अभिनेत्री फातिमा शेखने प्रतिक्रिया दिली आहे.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दंगल’मध्ये आमिर खान आणि फातिमा शेखने एकत्र स्क्रिन शेअर केली होती. अशातच सध्या सोशल मीडियावर हे दोघेही 'सीतारे जमीन पर'मध्ये एकत्र दिसणार आहेत, अशी चर्चा होती. पण अभिनेत्री फातिमा शेखने या चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत तिने चित्रपटाविषयी माहिती दिली आहे. यावेळी फातिमाला अमिर खान आणि तू पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत, नेमकं काय आहे.

यावर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री फातिमा शेख म्हणाली, “ मी आणि आमिर एकत्र दिसणार नाही. जर असं काही असेल, तर तुम्हाला लवकरच कळेल. सध्या तरी ही बातमी खोटी आहे. मी आणि आमिर एकत्र दिसणार नाही.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर आमिर आणि फातिमाच्या चित्रपटाची चर्चा होत आहे.

आमिर खानबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता मुंबई सोडून चेन्नईला शिफ्ट होणार असल्याचे बोलले जात आहे. अभिनेता त्याच्या वैयक्तिक कारणांमुळे मुंबई सोडून जात असल्याची माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे. आमिरसाठी त्याचे कुटुंब खूप महत्त्वाचे आहे आणि कुटुंबाचाच त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आमिर खानची आई झीनथ हुसैन चैन्नईच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आमिर खानला आईसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. यासाठी तो चेन्नईत शिफ्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT