actress Claire Nielson Saam tv
मनोरंजन बातम्या

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; सिनेविश्वात शोककळा

Actress Death: ‘फॉल्टी टॉवर्स’ आणि ‘घोस्ट स्क्वॉड’मधील प्रसिद्ध अभिनेत्री क्लेअर नीलसन यांचे वयाच्या निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Shruti Vilas Kadam

Actress Death: ब्रिटिश दूरदर्शन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री क्लेअर नीलसन यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले आहे. ‘फॉल्टी टॉवर्स’ आणि ‘घोस्ट स्क्वॉड’सारख्या लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्या प्रेक्षकांच्या कायम मनात घर करुन राहिल्या. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.

डेली एक्सप्रेसच्या माहितीनुसार त्यांचे निधन वयाच्या ८९ व्या वर्षी २९ एप्रिल रोजी झाले. पण काही कारणास्तव त्यांच्या परिवाराने ही बातमी आणि त्यांच्या निधनाचे कारण कोणालाही न कळवण्याचा निर्णय घेतला होता. त्या शेवटच्या 2008 मध्ये 'होल्बी सिटी' मालिकेत दिसल्या होत्या. त्यांनी या मालिकेतही आपली वेगळी छाप प्रेक्षकांवर सोडली होती.

क्लेअर नीलसन यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक गाजलेल्या टीव्ही मालिका, नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केलं. विशेषतः ‘Fawlty Towers’ या लोकप्रिय ब्रिटिश कॉमेडी मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यांच्या सहज आणि प्रभावी अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं.

स्कॉटलंडमध्ये जन्मलेल्या क्लेअर यांनी अभिनयाचं शिक्षण घेतल्यानंतर रंगभूमीपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ‘द टू रॉनीज’, ‘अपस्टेअर्स डाउनस्टेअर्स’ आणि ‘द डिक एमरी शो’ यांसारख्या शोमधील त्यांच्या कामाचीही मोठी चर्चा झाली होती.

वयाच्या उत्तरार्धात त्यांनी लेखन आणि अभिनय शिक्षण क्षेत्रातही काम केलं. त्यांनी मुलांसाठी पुस्तक लिहिलं तसेच अभिनय कार्यशाळाही सुरू केली होती. त्यांचा आपल्याकडे असलेले ज्ञान हे आपल्या पुढील पिढीला दिले पाहिजे या विचारांवर दांडगा विश्वास होता. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वामुळे त्या केवळ अभिनेत्रीच नव्हे तर एक उत्तम मार्गदर्शक म्हणूनही ओळखल्या जात होत्या. क्लेअर नीलसन यांच्या निधनानंतर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे.

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT