Bardovi Marathi Movie Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bardovi Trailer : तांत्रिक, विद्या अन् रहस्य..., छाया कदमच्या 'बारदोवी'चा थरकाप उडवणारा ट्रेलर रिलीज

Chhaya Kadam Bardovi Movie : छाया कदम यांचा 'बारदोवी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ट्रेलरमधून चित्रपटाबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Apurva Kulkarni

छाया कदम यांच्या मुख्य भूमिकेत असलेला 'बारदोवी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून ट्रेलरमधून चित्रपटाबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

तांत्रिक विद्या, कर्मकांड, नरबळी अशा घटनामध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. ग्रामिण भागात नरबळीसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. लहान मुलांचं अपहरण करून मुलांचं वशीकरण करणं अश्या बातम्या आपण नेहमीच ऐकत आणि वाचत असतो. याच घटनेवर आधारित बारदेवी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला असून हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी सगळीकडे प्रदर्शित होणार आहे.

'बारादोवी' या चित्रपटचा ट्रेलर आज सोशल मीडियवार लाँन्च करण्यात आलाय.. तांत्रिक विद्या, कर्मकांड, तांत्रिक रहस्य याच्या आधारावर बारादेवी चित्रपट असणार आहे. करण चव्हाण यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे. सतोरी एन्टरटेन्मेंटद्वारे हा चित्रपट प्रस्तुत करण्यात आला असून कृष्णार्पण मोशन पिक्चर्सद्वारे चित्रपटाची निर्मीती करण्यात आली आहे.. छाया कदम या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणार आहे. अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे यांचाही चित्रपटात अभिनय पहायला मिळणार आहे.

'बारदोवी' चित्रपट 2 मिनिटे 13 सेकंदाचा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तांत्रिक विद्येचा वापर करण्यात आल्याचं दिसत आहे. सतत बेपत्ता होणारी मुले आणि त्यांचा शोध घेणारे पोलीस अशी रंजन कथा ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.. तसंच कर्मकांड, वशीकरण सारख्या घटना आणि लहान मुलांचं वशिकरण यामुळं चित्रपटाची उत्कंठा शिगेला लागली आहे. चित्रपटाचा ट्रेलर थरकाप उडवणारा असला तरी चित्रपट पाहिल्यानंतर कथा उलघडणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT