Actress Athiya Shetty and Indian cricketer K.L. Rahul  Saam Tv
मनोरंजन बातम्या

चर्चा तर आहेच! अथिया शेट्टी-केएल राहुल यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला, पण...

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया पुढील तीन महिन्यांत के.एल. राहुलसोबत लग्न करू शकते. त्यासाठी दोघांच्याही कुटुंबांनी तयारीही सुरू केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेत्री अथिया शेट्टी(Athiya Shetty) आणि भारतीय क्रिकेटपटू के.एल. राहुल(K.L.Rahul) अनेकदा एकत्र दिसले आहेत. हे दोघेही अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आपल्या नात्यामुळे चर्चेत असलेले हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया पुढील तीन महिन्यांत के.एल. राहुलसोबत लग्न करू शकते. त्यासाठी दोघांच्याही कुटुंबांनी तयारीही सुरू केली आहे.

अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के. एल. राहुल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लग्नाची तयारीही सुरू केली आहे. माहितीनुसार, राहुलचे कुटुंबीय अथिया आणि तिच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. दोघेही नुकतेच त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबासोबत गेले होते. लग्नानंतर अथिया आणि राहुल याच नवीन घरात राहणार असल्याचे बोलले जात आहे. या घराचे काम वेगाने सुरू आहे. येत्या ३ महिन्यांत ते मुंबईत लग्न करू शकतात.

अथिया शेट्टी आणि के.एल. राहुल मोठ्या थाटात लग्न करणार आहेत. अथिया स्वतः लग्नाशी संबंधित सर्व तयारीवर लक्ष ठेवून आहे. अथिया आणि राहुल ३ वर्षांपासून डेट करत आहेत. अथियाचा भाऊ अहान शेट्टीच्या 'तडप' या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला राहुलही हजर राहिला होता. तेव्हा हे कपल पहिल्यांदाच एकत्र दिसले होते.

या वर्षाच्या सुरुवातीला एप्रिल महिन्यामध्ये अथिया शेट्टी आणि के.एल. राहुल लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर डिसेंबरमध्ये लग्न होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या वृत्तांवर प्रतिक्रिया देताना सुनील शेट्टीनी सांगितले की, 'ती माझी मुलगी आहे, तिचे लवकरच लग्न होईल. अहानचेही लग्न लवकर व्हावे अशी माझी इच्छा आहे. लग्न कधी करायचे ही त्यांची इच्छा आहे. के.एल. राहुल मला सुरुवातीपासूनच खूप आवडतो. आता त्यांनी कधी लग्न करायचा हा त्यांचा निर्णय आहे. माझे आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT