Ameesha Patel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ameesha Patel: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईच्या घरात कामवाल्या बाईनेच केली चोरी, लाखोंच्या हिऱ्यांच्या बांगड्या चोरल्या

Ameesha Patel: अभिनेत्री अमीषा पटेलच्या आई आशा पटेल यांच्या घरातून ५ लाखांच्या हिरेजडित बांगड्या चोरीला गेल्या. पोलिसांनी घरकाम करणाऱ्या महिलेला अटक केली असून तपास सुरू आहे.

Shruti Vilas Kadam

Ameesha Patel: ‘गदर’ फेम अभिनेत्री अमीषा पटेल सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अमीषाची आई आशा पटेल यांच्या घरातून तब्बल ५ लाख रुपयांचे हिरेजडित बांगड्या चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी एका घरकाम करणाऱ्या महिलेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे नाव सीमा विनोद घाटे असून ती ४० वर्षांची आहे. ती विरार येथे राहत असून गेल्या दीड वर्षांपासून आशा पटेल यांच्या घरी घरकाम करत होती. जानेवारी महिन्यात आशा पटेल यांच्या घरातून ५ लाख रुपये किमतीच्या हिरेजडित बांगड्या गायब झाल्या. बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर आशा पटेल यांनी घरातील काम करणाऱ्या सीमावर संशय व्यक्त केला.

BIGG आरोप फेटाळल्यानंतर पोलिसांत तक्रार

आशा पटेल यांनी सीमाकडे बांगड्यांबाबत चौकशी केली. मात्र, सीमाने आपल्यावरील आरोप वारंवार फेटाळून लावले. त्यानंतर आशा पटेल यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसांशी संपर्क साधत याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस निरीक्षक वाटकर यांच्या देखरेखीखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी सीमाचा शोध घेत तिला विरार येथून ताब्यात घेतले.

१५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

अटक केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चोरीला गेलेल्या हिरेजडित बांगड्या अद्याप पोलिसांच्या हाती लागलेल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून बांगड्यांचा शोध सुरू आहे. तसेच सीमा घाटेचा यापूर्वी कोणत्याही गुन्ह्यात सहभाग होता का, याचाही तपास केला जात आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप चौधरी आणि मरीन ड्राईव्ह पोलिसांचे गुन्हे शोध पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अमीषा पटेल पुन्हा ‘गदर’च्या भूमिकेत

दरम्यान, अमीषा पटेलच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००० मध्ये ‘कहो ना... प्यार है’ या चित्रपटातून हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामुळे अमीषाला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. २०२३ मध्ये ‘गदर २’मधून अमीषाने पुन्हा ‘सकीना’ची भूमिका साकारली. सनी देओलसोबतच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आता ‘गदर ३’बाबतही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. अमीषाने मे महिन्यात ‘गदर ३’च्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दक्षिणेत वार फिरलं,भाजपचं टेन्शन वाढलं! इंडिया आघाडीत विजय यांच्या पक्षाची एन्ट्री

खरीपनंतर रब्बी हंगामसुद्धा संकटात; मुंबईसह निम्म्या राज्यातून मोसमी पावसाची माघार

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT