Alia Bhatt anf Ranbir Kapoor Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

रणबीर कपूरला आलिया भट्टसोबत वाटतं सुरक्षित; म्हणाला, बाळाच्या स्वागतासाठी...

अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा पती अभिनेता रणबीर कपूर सध्या खूप खूश आहेत. हे कपल त्यांच्या होणाऱ्या बाळामुळेही चर्चेत आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) आणि तिचा पती अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor) सध्या खूप खूश आहेत. हे कपल त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे लाइमलाइटमध्ये आहेत. याचबरोबर आता हे कपल त्यांच्या होणाऱ्या बाळामुळेही चर्चेत आले आहेत. आलिया-रणबीरने पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या जवळपास दोन महिन्यांनंतर हे कपल आता आपल्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

'शमशेरा' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीर कपूरने त्याच्या बाळाच्या आगमनाविषयी सांगितले. यासोबतच त्याने पत्नी आलिया भट्टचेही कौतुक केले. त्याला आलियासोबत खूप सुरक्षित वाटत असल्याचेही सांगितले. अलीकडेच रणबीरने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले की, 'आलिया आणि मी खूप चांगले मित्र होतो आणि आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडते'.

'आम्ही एकमेकांना सर्व गोष्टी सांगतो आणि एकमेकांसोबत खूप प्रामाणिक आहोत. मी फारसा भावुक होणारा माणूस नाही, पण मला तिच्यासोबत नेहमी व्यक्त व्हायचं असते. आपल्याला माहिती असते आपलं कोणावर प्रेम आहे. आपल्याला कोणासोबत सुरक्षित वाटतं. त्याचप्रमाणे मलाही आलियासोबत नेहमीच सुरक्षित वाटतं आणि मला माहिती आहे, तिलाही माझ्यासोबत सुरक्षित वाटतं. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही एकमेकांचे जीवनसाथी आहोत', असे रणबीर म्हणाला.

रणबीर कपूरने पुढे सांगितले की, तो आणि आलिया पहिल्या दिवसापासून खूप खूश आहेत. रणबीरने सांगितले की, 'मला आणि आलियाला बाळ हवं होतं. 'आयुष्यातील नवीन चॅप्टर सुरू करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

Alcohol Side Effects: दारू प्यायल्यानंतर व्यक्तीचं नियंत्रण का सुटतं?

घरी बोलवायचा, अश्लील भाषेत बोलायचा, स्टेशन मास्तरचा संतापजनक प्रकार; महिलेची मनसेकडे तक्रार अन् पुढे काय घडलं?

SCROLL FOR NEXT