Qayamat Qayamat Song Aishwarya- Aaradhya Dance Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Qayamat Song Aishwarya- Aaradhya Dance: ‘कयामत… कयामत’ गाण्यावर ऐश्वर्या रायने लेक आराध्यासोबत केला अफलातून डान्स; VIDEO व्हायरल

Aishwarya- Aaradhya Dance Viral Video: सोशल मीडियावर ऐश्वर्याचा आणि तिची लेक आराध्या ह्या दोघींचा एका डान्सचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Qayamat Qayamat Song Aishwarya- Aaradhya Dance Viral Video

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच आपल्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असते. अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये ऐश्वर्यासोबत तिची लेक आराध्याही अनेकदा स्पॉट होते. ऐश्वर्याचे चित्रपट जरीही प्रेक्षकांच्या भेटीला येत नसले तरीही, तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याचा आणि तिची लेक आराध्या ह्या दोघींचा एका डान्सचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दोघींच्याही त्या भन्नाट डान्सची तुफान चर्चा रंगली आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये, माय लेकींनी ‘कयामत… कयामत’ गाण्यावर एका पार्टीमध्ये खूप सुंदर डान्स केला आहे. हा डान्सचा व्हिडीओ इन्सटंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ऐश्वर्या आणि आराध्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया डिसोझा- देशमुखही दिसत आहे. नेमका हा कोणता फंक्शन आहे, हे कळू शकलेलं नाही. सध्या या दोघींच्याही डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओवर, नेटकऱ्यांनी दोघींच्याही डान्सचे तोंडभरून कौतुक केले आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले आहेत. तर ४ मिलियन्सहून अधिक चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. आराध्या बच्चनबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री ऐश्वर्या राय – अभिनेता अभिषेक बच्चन यांची लेक आहे. आराध्या सध्या धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपलं शालेय शिक्षण घेत आहे. ती कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT