Amrapali Dubey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress: 'मला आई व्हायचंय...'; 39 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबासमोर व्यक्त केली मनातील इच्छा

Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीने 'मला आई व्हायचंय' म्हणत मोठा निर्णय जाहीर केला आहे. तिची भावनिक प्रतिक्रिया आणि शोचे प्रोमो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Shruti Vilas Kadam

Famous Actress: भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आम्रपाली दुबे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या आगामी 'भोजपुरी बवाल' या रिअॅलिटी शोमुळे ती चर्चेचा विषय ठरली आहे. 2 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या शोचे अनेक प्रोमो आतापर्यंत प्रदर्शित झाले असून, त्यातील एका नव्या प्रोमोने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले आहे. या प्रोमोमध्ये आम्रपाली तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय जाहीर करताना दिसते.

प्रोमोमध्ये मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्रपाली आपल्या कुटुंबासमोर भावनिक होत म्हणते, "मी माझ्या आयुष्यातील कदाचित सर्वात मोठा निर्णय घेणार आहे. याचा काय परिणाम होईल, कुटुंब आणि चाहते काय म्हणतील हे मला माहीत नाही. पण मला आई व्हायचंय." तिच्या या वक्तव्यानंतर घरातील सर्व सदस्य अवाक होतात.

आम्रपालीचे वडील तिचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित होतात आणि विचारतात, "तू नेमकं काय म्हणतेय?". तर तिची बहीण तिला, "तुला या निर्णयाबद्दल पूर्ण खात्री आहे ना?" असे विचारते. यावर आम्रपाली याबद्दल "हो, मला याबाबत पूर्ण खात्री आहे," असे ठामपणे सांगते. त्यामुळे हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, शोचा आणखी एक भावनिक प्रोमोही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ आम्रपालीच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसतो. मात्र त्यानंतर आम्रपालीची आई तिला, "तू तुझ्या वजनाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे," असा सल्ला देते. आईचे हे शब्द ऐकताच आम्रपाली भावूक होते.

ती म्हणते, "आई, हे ऐकून खूप वाईट वाटतं. सगळेजण 24 तास फक्त वजन कमी करण्याबद्दलच बोलत असतात." एवढं बोलून तिला अश्रू अनावर होतात. या प्रोमोमुळे अनेकांनी बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावरही चर्चा सुरू केली आहे.

'भोजपुरी बवाल' हा रिअॅलिटी शो 2 ऑगस्टपासून 'कलर्स' वाहिनीवर तसेच 'जिओ हॉटस्टार' या OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये आम्रपाली दुबेव्यतिरिक्त दिनेश लाल यादव 'निरहुआ', पवन सिंग, काजल राघवानी आणि तेज प्रताप यादव यांसारखे लोकप्रिय भोजपुरी कलाकारही सहभागी होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीत आज मराठा अभ्यासकांची दुपारी १२ वाजता होणार बैठक

Good News: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कर्जतवरून थेट पनवेलला करा प्रवास; नवा रेल्वेमार्ग 'या' दिवशी होणार सुरू

Shravan Fast : श्रावणात महिनाभर दारू न प्यायल्यास शरीरात होतील 'हे' ६ फायदे; वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Sunday Horoscope: या 5 राशींवर होणार धनवर्षाव! नोकरी-व्यवसायात मिळणार मोठी संधी, वाचा आजचे राशीभविष्य

केडीएमसीत भाजप-शिंदेसेना-मनसेमध्ये शीतयुद्ध; नाव न घेता मनसेला इशारा, चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT