बंगळुरू विमानतळावर अभिनेता विजय सेतुपती यांच्यावर अज्ञात व्यक्तीचा हल्ला...(पहा व्हिडिओ) Saam Tv
मनोरंजन बातम्या

बंगळुरू विमानतळावर अभिनेता विजय सेतुपती यांच्यावर अज्ञात व्यक्तीचा हल्ला...(पहा व्हिडिओ)

लोकप्रिय तमिळ अभिनेता विजय सेतुपती यांच्यावर बेंगळुरू विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लोकप्रिय तमिळ अभिनेता विजय सेतुपती यांच्यावर बेंगळुरू विमानतळावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये विजय विमानतळावरून बाहेर पडत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर पाठीमागून हल्ला केला आहे. विमानतळावर अचानक झालेल्या या हल्ल्याने विजय सेतुपती यांना मोठा धक्काच बसला आहे.

हे देखील पहा-

व्हिडीओ बघून असे दिसून येते की विजय सेतुपती बरोबर असलेल्या त्याच्या सहाय्यकाला बदला घ्यायचा होता. मात्र, विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तसे करण्यापासून रोखले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता अभिनेता शुटिंगसाठी बंगळुरूला गेला होता. हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या पत्रकाराला एका ट्विटर युजरने प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट केले की, काल रात्री KIAL या ठिकाणी ही घटना घडली आहे.

विजय सेतुपतीचा सहाय्यक आणि आणखी एक मद्यधुंद प्रवासी यांच्यामध्ये काही वाद झाला होता. वादानंतर प्रवाशाने विजयच्या सहाय्यकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर प्रवाशाने माफी मागितल्यानंतर प्रकरण मिटवणायत आले होते. सेतुपतीचा सहाय्यक आणि मद्यधुंद प्रवासी यांच्यात मोठा वाद झाला होता. यामुळे प्रवाशाने सहाय्यकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा युजरने केला आहे.

प्रवाशाने माफी मागितल्यानंतर हे प्रकरण मिटल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. वर्क फ्रंटवर, विजय सेतुपती शेवटचा ‘अ‍ॅनाबेल सेतुपती’ मध्ये दिसला होता. ज्यामध्ये तापसी पन्नू देखील होती. हॉरर कॉमेडी १७ सप्टेंबर २०२१ दिवशी OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar वर रिलीज करण्यात आला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

जिम की योगा; वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

Ration Card New Rule: अंत्योदय अन्न योजनेत मोठा बदल; आता रेशनकार्डवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मिळेल ७ किलो धान्य

SCROLL FOR NEXT