Sukh Kalale Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sukh Kalale Serial: स्पृहा जोशीच्या 'सुख कळले' मालिकेत 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

Swati Deval Serial: २२ एप्रिलपासून ही मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेमध्ये स्पृहा जोशीसोबत अभिनेता सागर देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या मालिकेमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

Priya More

Spruha Joshi Serial:

मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) लवकरच 'सुख कळले' (Sukh Kalale Serial) या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. कलर्स मराठीवरील ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमा आऊट झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनामध्ये या मालिकेबाबतची उत्सुकता वाढली आहे. २२ एप्रिलपासून ही मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेमध्ये स्पृहा जोशीसोबत अभिनेता सागर देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या मालिकेमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्री स्वाती देवल सुख कळले या मालिकेमध्ये दिसणार आहे. या मालिकेमध्ये स्वाती देवलसोबत तिचा मुलगा देखील एन्ट्री करणार आहे. स्वातीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंवर पोस्ट करत ही माहिती दिली. या मालिकेमधील आता एक-एका कलाकारांची नावं समोर येत आहेत. स्पृहा जोशी, सागर देशमुख आणि बालकलाकार मिमी खडसे या कलाकारांनंतर आता स्वाती देवल आणि तिच्या मुलगा देखील या मालिकेमध्ये महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

स्वाती देवलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्पृहाच्या 'सुख कळले' या मालिकेतील एक फोटो पोस्ट करत लिहिले की, 'नवीन टीम, नवीन भूमिका, नवीन सुरूवात... पुन्हा एकदा येत आहे नव्या नावाने...आणि हो माझ्या स्वराद्धीच्या बरोबरीने भेटायला येते...लवकरच कलर्स मराठीवर' स्वाती देओलने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नमस्कार मंडळी....तुम्ही MTR मध्ये मला भरभरून प्रेम दिले. राणी मी होणारंच्या कांतावर ही करताय... आता पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येते आहे... नवीन भूमिकेतून माझ्या SWARAADHY ला घेऊन, नव्या टीमसोबत...नक्की बघा 'सुख कळले' आपल्या कलर्स मराठीवर...लवकरच'

दरम्यान, 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमात संगीताची जबाबदारी तुषार देवलने सांभाळली होती. या कार्यक्रमात त्याची पत्नी स्वाती देवल देखील काम करत होती. तुषार आणि स्वाती यांचा लेक आराध्य देखील या कार्यक्रमात दिसला होता. या कार्यक्रमानंतर स्वाती आता तिचा लेक आराध्य देखील सुख कळले मालिकेमध्ये काम करताना दिसणार आहे. त्यामुळे स्वातीचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Telecom Department: आता मोबाईलवर दिसणार कॉलरचं नाव; निनावी कॉल करणाऱ्यांना बसणार चाप

Thane Crime: भिंवडीत संतापजनक प्रकार; 65 वर्षाच्या महिलेवर बलात्कार करत हत्या; शेतात सापडला मृतदेह

MNS : मनसेकडून मतदारयादी घोळाचा पर्दाफाश; राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांनी शोधून काढली मोठी चूक

Thursday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Bachchu Kadu Farmer Protest: 'क्या समजते हो आप! भरगर्दीत बच्चू कडूंनी कलेक्टरला झापलं,पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT