Suvrat Joshi Look In Taali Instagram
मनोरंजन बातम्या

Suvrat Joshi Look In Taali: मी खरच कृतज्ञ आहे... तालीमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलेल्या सुव्रत जोशीची खास पोस्ट

Suvrat Joshi Latest Webseries : 'ताली' वेबसीरीजमधील सुव्रत जोशीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Suvrat Joshi Shared Video

सध्या 'ताली' या वेबसीरीजची प्रचंड चर्चा होत आहे. रवी जाधव दिग्दर्शित 'ताली' वेबसीरीजने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विशेष म्हणजे, वेबसीरीजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या मराठी कलाकारांवर कौतुकाची थाप पडत आहे. वेबसीरीजमधील सुव्रत जोशीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे.

श्रीगौरी सावंत यांच्या आयुष्यावर ताली वेबसीरीज आधारित आहे. तृतीयपंथीच्या आयुष्यावरील या वेबसीरीवर प्रेक्षक प्रेम करत आहेत. यातील कलाकरांचे विशेष कौतुक केले जात आहे. वेबसीरीजमध्ये अनेक मराठमोळ्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.यातील एक भूमिका म्हणजे 'मुन्ना'. ही भूमिका सुव्रत जोशीने साकारली आहे.

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे सुव्रत जोशी प्रसिद्धीस आला. यानंतर सुव्रतने अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेच नाटकांतून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सुव्रतने आता ताली या वेबसीरीजमधून हिंदीत पदार्पण केले आहे.

सुव्रत नेहमीच सोशल मीडियावरुन अपडेट शेअर करत असतो. नुकतीच त्याने ताली वेबसीरीजसाठी एक पोस्ट केली आहे. यात सुव्रत मुन्नाच्या लूकमध्ये दिसत आहे. मुन्ना हे तृतीयपंथी पात्र आहे. या पोस्टमध्ये त्यांने वेबसीरीजच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहे.

'अभिनय हे माझ्यासाठी स्वातंत्र्य आणि ओळख आहे. मी खरंच कृतज्ञ आहे की, मी एक कलाकार आहे. मी खरंच जगाचा आभारी आहे की, ज्याने मला या संधी दिल्या. यामध्ये मी माझ्या सर्व सीमा ओलांडून काहीतरी करु शकतो. स्वतः ला समजू शकतो. जीवन किती कठोर असू शकते. आणि लोक किती शूर असू शकतात. याचा अनूभव घ्या.

"ताली" आणि ताली मधील"मुन्ना" ची माझ्या हृदयात नेहमीच खास जागा असेल. जर तुम्ही 'ताली' पाहिला नसेल तर 'जिओ सिनेमा' या प्लॅटफॉर्मवर नक्की पाहा.असं कॅप्शन सुव्रतने लिहलं आहे.

सुव्रत जोशीने ताली या वेबसीरीजमधून त्याच्या अभिनयाची एक बाजू सर्वांना दाखवली आहे. त्याच्या या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ताली वेबसीरीजमध्ये मराठमोळ्या कलाकारांनी अभूतपूर्व कामगिरी केली आहे. तालीमध्ये सुव्रत जोशी, कृतिका देव, ऐश्वर्या नारकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: विनोद तावडेंच्या भेटीनंतर एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर; ठाकरेंसोबतच्या भेटीमागचं नेमकं कारण काय?

मोठी बातमी! सरकारनं ५० हजारांसह हटवली आणखी एक अट; आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT