Siddharth Jadhav Dance  Instagram @siddharth23oct
मनोरंजन बातम्या

Siddharth Jadhav Post: 'हा' क्षण येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते..., अशोक मामांसाठी सिद्धूची भावनिक पोस्ट

Tribute To Ashok Saraf: सिद्धार्थ, अशोक मामांच्या पायावर नतमस्तक झाला.

Pooja Dange

Siddharth Jadhav' Tribute To Ashok Saraf: अभिनेते अशोक सराफ यांना झी चित्रगौरव पुरस्कार २०२३ चा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अभिनेता सिद्धांत जाधवने अशोक सराफ यांच्या एव्हरग्रीन गाण्यांवर परफॉर्मन्स केला. सिद्धार्थने त्याच्या या सादरीकरणाच्या माध्यमातून दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास दाखवला.

सिद्धार्थ डान्स सादर केल्यानंतर स्टेजवरून खाली आला. त्यानंतर त्याने अशोक सराफ यांच्या गळ्यात हार घातला आणि त्यांच्या पायावर तो नतमस्तक झाला. यावेळी सर्वांच्या डोळ्यात पाणी होते. सर्वजण खूप भावुक झाले होते.

सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर पोस्ट करत अशोक सराफ यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. सिद्धार्थने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'अशोक सराफ... अशोक मामा... माझ्यासारख्या कित्तेक नवोदित कलाकारांसाठी असलेले द्रोणाचार्य आणि त्यांची मूर्ती मनात बसवून काम करू पाहणारे आम्ही एकलव्य.... त्याच्या पायाशी कधी बसायला मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.

पण आयुष्यातला हा खूप मोठा क्षण आहे जिथे त्यांच्या आयुष्याची कहाणी त्यांच्या समोर मांडण्याची संधी मला मिळाली... आणि अशोक मामांना ती मनापासून आवडली.. भारावल्या डोळ्यांनी त्यांनी कौतुक केलं.. आशिर्वाद दिले... मामांना जीवनगौरव मिळाला हे आहेच पण त्यांच्यासमोर असा परफॉर्मन्स करून माझ्या जीवनाचं सार्थक झालं.... हा क्षण आयुष्यभर माझ्या लक्षांत राहील.... मनापासून आभार @zeemarathiofficial

यासह सिद्धार्थने अशोक सराफ यांच्या पायाजवळ बसवून काढलेला फोटो शेअर केला आहे. सिद्धार्थच्या या पोस्ट त्याला अनेक कमेंट नेटकरी करत आहेत. तसेच त्याच्या साधेपणाचे कौतुक करणाऱ्या अनेक कमेंट त्याच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : प्रेमाचे रूपांतर विवाहात होईल, तर काहींच्या अंगावर येतील अनेक जबाबदाऱ्या, तुमची रास यात आहे का?

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

SCROLL FOR NEXT