CID Producer Passed Away  Saam TV
मनोरंजन बातम्या

CID Producer: टीव्हीवर २० वर्षे गाजलेल्या CID मालिकेच्या निर्मात्याचे निधन; जवळच्या मित्रासाठी शिवाजी साटमची भावनिक पोस्ट

सीआयडी मालिकाचे सहनिर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन झाले आहे.

Saam Tv

CID Producer Passed Away: भारतीय टीव्ही जगतातील दीर्घकाळ चालणारी मालिका म्हणजे सीआयडी. या मालिकेतील पात्र आजही लक्षात आहेत. या प्रसिद्ध मालिकेतील एका महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.

सीआयडी मालिकाचे सहनिर्माते प्रदीप उप्पूर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर अभिनेते शिवाजी साटम यांनीही शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत शिवाजी साटम यांनी मित्र गमवल्याचे दुःख व्यक्त करत मित्रासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रदीप उप्पूर कर्करोगाने ग्रस्त होते. निधनाच्या वेळी ते सिंगापूरमध्ये होते. शिवाजी साटम यांनी इन्स्टाग्रामवर प्रदीप यांचा फोटो शेअर केला. तसेच कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “प्रदीप उप्पूर, (निर्माता, सीआयडीचा आधारस्तंभ)….. नेहमी हसतमुख राहणार एक जवळचा मित्र, प्रामाणिक आणि स्पष्टवक्ता, मानाने खूप उदार... माझ्या आयुष्यातील एक मोठा आणि सुंदर अध्याय तुझ्या जाण्याने संपत आहे बॉस... लव्ह यू आणि तुझी आठवण येत राहील मित्रा”.

शिवाजी साटम यांच्या या पोस्टवर त्याचे अनेक चाहते आणि सहकलाकार यावर कमेंट करून दुःख व्यक्त करत आहेत.

सीआयडी हा भारतीय टेलिव्हिजनवरील खूप काळ चालणाऱ्या कार्यक्रमांपैकी एक होता. सोनी एंटरटेनमेंटवर प्रसारित झालेल्या या शोची सुरूवात 1998 मध्ये झाली होती. 2018 मध्ये या शोचा शेवटचा भाग प्रसारित झाला.

ACP प्रद्युम्न आणि डॉ. साळुंखे यांच्या व्यतिरिक्त, शोच्या लोकप्रिय पात्रांमध्ये दयानंद शेट्टी यांनी साकारलेला दया आणि आदित्य श्रीवास्तव यांनी साकारलेला अभिजीत ही पात्रे देखील गाजली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT