Sayaji Shinde Health Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sayaji Shinde Health Update: ‘आता पुढे काहीही होणार नाही....’, एन्जोप्लास्टीनंतर सयाजी शिंदेंनी रुग्णालयातून व्हिडीओ शेअर करत दिली हेल्थ अपडेट

Chetan Bodke

Sayaji Shinde Health Update

अभिनेते सयाजी शिंदे (Actor Sayaji Shinde) यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकतंच त्यांच्यावर हृदयासंबंधित शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यांच्या छातीतल्या एका रक्त वाहिनीमध्ये ब्लॉक अढळला होता. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून लवकरच डिस्चार्ज देणार असल्याचे काल डॉक्टरांनी सांगितले होते. अशातच आता सयाजी शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर रुग्णालयातील व्हिडीओ शेअर करत त्यांची हेल्थ अपडेट दिली आहे. (Marathi Actors)

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेते सयाजी शिंदे म्हणतात, “नमस्कार! माझे सर्व हितचिंतक, रसिक प्रेक्षक. यांच्या सगळ्यांना मला खुप शुभेच्छा असतात. सगळ्यांना एक सांगायचंय मला माझी तब्येत चांगली आहे. खबरदारी म्हणून मी माझी हेल्थ चेकअप करुन घेतली. त्यात माझ्या छातीमध्ये एक ब्लॉकेज आढळलं. पण ते सहज निघालं. म्हणजे पुढे कधीतरी अटॅक येऊ शकला असता. अशी परिस्थिती होती. पण आता पुढे काहीही होणार नाही.”

“पुढील दहा वर्षे मी अजून चांगलं काम करणार आहे. आपल्या सेवेत पुन्हा असेल मी. इन्स्टाग्रामला असेल, यूट्यूबला असेल. आपली मजा-मस्ती सुरु राहिलं. काळजी करु नका मी आनंदी आहे, मजेत आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद...” असंही सयाजी शिंदे यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं.(Social Media)

सयाजी शिंदे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, “नमस्कार, मी एकदम व्यवस्थित आहे, माझ्यावर प्रेम करणारे सर्व रसिक, माझे हितचिंतक सर्वांच्या शुभेच्छा माझ्यासोबत असतात, आता काळजी करण्यासारखं काही नाही, लवकरच तुमच्या मनोरंजनासाठी उपस्थित राहील धन्यवाद...!!!” (Health)

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हेल्थबद्दल हृदयविकार तज्ञ डॉ .सोमनाथ साबळे यांनी सांगितले की, “गेल्या काही दिवसांपूर्वी सयाजी शिंदे यांच्या छातीमध्ये डिसकम्फर्ट जाणवत होता. अचानक दुखू लागल्याने त्यांनी साताऱ्यामध्ये काही तपासण्या करून घेतल्या होत्या. केलेल्या चेकअपमध्ये इसीजीमध्ये काही बदल जाणवले. त्यांची टू डी इको कार्डियोग्राफी केली, त्यामध्ये हृदयाच्या छोट्या भागाची हालचाल व्यवस्थित होत नसल्याचं जाणवलं. आम्ही त्यांची अँजिओग्राफी देखील केली. हृदयाच्या तीन पैकी दोन रक्त वाहिन्या अगदी सुरळीत काम करीत आहे. पण उजव्या बाजुच्या रक्तवाहिन्यांमध्ये तोंडाकडे ९९ % चा ब्लॉक अढळला. त्यांनी लवकरात लवकर एन्जोग्राफी केल्यामुळे हार्ट ॲटेक येण्याआधी स्वत:चा बचाव केला आहे. आता त्यांची प्रकृती आता ठीक आहे.” (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

SCROLL FOR NEXT