Shamshera Image Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shamshera : रणबीर कपूरने दिल्या होत्या शमशेराच्या दिग्दर्शकाला शिव्या, वाचा नेमकं काय घडलं

अभिनेता रणबीर कपूरचा 'शमशेरा' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये तो दुहेरी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाद्वारे रणबीर कपूर बऱ्याच काळानंतर पुनरागमन करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : अभिनेता रणबीर कपूरचा 'शमशेरा'(Shamshera) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये तो दुहेरी भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाद्वारे रणबीर कपूर बऱ्याच काळानंतर पुनरागमन करणार आहे. त्यामुळे रणबीर आणि शमशेराची संपूर्ण टीम खूप उत्साही आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये रणबीरने नुकतेच चित्रपटाच्या शूटिंगबाबत काही रंजक खुलासे केले आहेत.

'शमशेरा'मध्ये रणबीर कपूर(Ranbir Kapoor) पहिल्यांदाच अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. शमशेरामध्ये रणबीरसोबत वाणी कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पडद्यावर चॉकलेट बॉय असलेल्या रणबीरसाठी हा चित्रपट सोपा नव्हता. या चित्रपटात रणबीरने वडील आणि मुलाची भूमिका साकारली होती. अलीकडेच त्याने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, घडलेल्या अनेक मजेदार गोष्टींचा खूलासा केला आहे.

रणबीर कपूरने एका मुलाखतीत या संदर्भात खूलासा केला आहे. 'चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान धुळीमुळे त्याला खूप त्रास झाला होता. रणबीरने सांगितले की, 'सेटवर दररोज १०-१५ किलो धूळ ठेवली जात होती. शूटिंग सुरू होताच ही धूळ उडायची. ती धूळ आमच्या डोळ्यात, कानात आणि तोंडात जायची आणि त्यामुळे अनेकदा डायलॉगही बोलता येत नव्हते'.

या धुळीमुळे त्याला एकदा नव्हे तर २०-२० वेळा अंघोळ करावी लागायची आणि प्रत्येकवेळी अंघोळ करताना धूळ आणि चिखल दिसत होते, असा खूलासा रणबीरने केला. १-२ वेळा अंघोळ करून धूळ पूर्णपणे साफ न झाल्याने त्याला पुन्हा-पुन्हा आंघोळ करावी लागत होती.

रणबीरने पुढे सांगितले की, धुळीच्या समस्येने तो इतका त्रस्त झाला होता की तो मनातल्या मनात दिग्दर्शकाला शिव्या द्यायचा. रणबीर पुढे म्हणाला की, आता जेव्हा तो पडद्यावर त्याचे काम पाहतो तेव्हा त्याला अस वाटते की त्याची संपूर्ण टीमची मेहनतीमध्ये यशस्वी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT