Rajnikanth Jailer Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jailer Movie Box Office Collection: रजनीकांत गाजतोय, नाचतोय अख्ख्या जगात; पहिल्याच दिवशी केली तगडी कमाई

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jailer Movie

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रजनीकांत यांनी खूप नावलौकीक कमावला आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात रजनीकांत यांनी आपली छाप पाडली आहे. रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

गुरुवारी रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची संपूर्ण जगभर चर्चा आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे.

'जेलर' चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५२ कोटींचा गल्ला गाठला आहे. चित्रपटाने तमिळनाडूमध्ये २३ कोटी, कर्नाटकमध्ये ११ कोटी तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून १० कोटींची कमाई केली आहे. रजनीकांतच्या जेलरने जगभरात एकत्रितपणे ८७ कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने भारतात तमिळनाडू आणि केरळमध्ये सर्वात जास्त कमाई केली आहे.

चित्रपटाबाबत तमिळनाडूचे थिएटर ओनर्स असोसिएशनचे प्रमुख तिरुपूर सुब्रमण्यम यांनी माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तमिळनाडूमध्ये ९०० स्क्रिन्सवर हा चित्रपट दाखवला जात आहे. चित्रपटासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.चित्रपट येत्या काही दिवसात खूप कमाई करेन असा अंदाज वर्तवला जात आहे.

रजनीकांतचे सर्वात जास्त चाहते हे साउथमध्ये आहे. त्यामुळेच'जेलर' चित्रपट प्रदर्शित झालेल्या दिवशी बेंगळूरू आणि चेन्नईमध्ये कंपन्याना सुट्टी देण्यात आली होती. रजनीकांतच्या या चित्रपटाला चाहत्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

चित्रपटाबद्दल खास गोष्ट म्हणजे, चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी हिमालयला गेले. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी रजनिकांत यांनी हिमालय गाठले म्हणून चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

SCROLL FOR NEXT