Srikanth Film Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Srikanth Film Collection : 'श्रीकांत'चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला, राजकुमार रावच्या अभिनयाचे होतंय कौतुक

Srikanth Film Box Office Collection : 'श्रीकांत' चित्रपटाचे प्रेक्षक कौतुक करीत असून चाहत्यांना चित्रपटाची कथा प्रचंड भावलेली आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे जोरदार कौतुक करीत आहेत.

Chetan Bodke

श्रीकांत बोला यांचा जीवनप्रवास ‘श्रीकांत’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. श्रीकांत बोला हे दृष्टीहीन आहेत. 'बोलंट इंडस्ट्री'चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यासोबतच ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्समधील ते पहिले आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी आहे. हा बायोपिक बॉक्स ऑफिसवर १० मे रोजी रिलीज झाला आहे.

या बायोपिकचं दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. सध्या चित्रपटाचे प्रेक्षक कौतुक करीत असून चाहत्यांना चित्रपटाची कथा प्रचंड भावलेली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे जोरदार कौतुक केले जात आहे.

नुकतंच निर्मात्यानी चित्रपटाच्या कमाईचा आकडा शेअर केलेला आहे. चित्रपटाने ११ दिवसांत बॉक्स ऑफिसवर २८ कोटींची कमाई केलेली आहे. सध्या चित्रपटाचे प्रेक्षक जोरदार कौतुक करीत आहेत. राजकुमारच्या चित्रपटाला प्रेक्षकाकंडून उत्तम प्रतिसाद मिळत असून त्याच्या अभिनयाचंही सर्वत्र कौतुक होत आहे. दिग्दर्शक तुषार हिरानंदानी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन अगदी उत्तम केलं असून चित्रपटात त्याच्या आयुष्यातील संघर्ष त्यावर त्याने केलेली मात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

श्रीकांत बोला यांचा हा जीवनप्रवास केवळ दृष्टिहिनांसाठीच नाही तर डोळस व्यक्तींसाठीही प्रेरणादायी आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत राजकुमार रावसोबत ज्योतिका, शरद केळकर, आलया एफ आणि जमील खानही आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमारने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT