Big Boss Marathi INSTAGRAM
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5 : "अरे मर्दांनो उठा.. त्या फिक्कीचा माज उतरवा... ".. अभिनेता पुष्कर जोग निक्किवर भडकला

Actor Pushkar Jog Shared Post About Nikki's Behaviour : बिग बॉसच्या घरात निक्कीने पुन्हा एकदा वर्षा उसगावकर यांचा अपमान केल्याने पुष्कर जोगने पोस्ट शेअर करून आपला राग व्यक्त केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Big Boss Marathi season 5 update : बिग बॉस मराठीचा ५ वा सीजन या न त्या कारणानेसारखा चर्चेत आहेत. घरातले ६ आठवडे संपेपर्यंत सगळी समीकरणं बदललेली असतानाच आता पुन्हा एकदा निक्कीच्या हेकेखोर वागण्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार तिच्यावर संतापलेले बघायला मिळत आहेत.

एकीकडे अरबाज-निक्की संपूर्ण घराविरोधात जोडीने लढत असल्याचं पाहायला मिळत असतानाच वर्षा कॅप्टन झाल्यापासून ''मी घरात वॉशरुम स्वच्छ करणार नाही, काम करणार नाही'' अशी भूमिका निक्कीने घेतली आहे. जेवण आणि घरातल्या कामांवरून झालेल्या भांडणांमध्ये निक्कीने वर्षा उसगांवकरांबद्दल पुन्हा एकदा चुकीचे शब्द वापरल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे मराठी कलाकार तिच्यावर चांगलेच संतापलेले बघायला मिळत आहेत.

निक्की वर्षा ताईंना काय म्हणाली ?

''तुमच्यासमोर मी आत बाथरुममध्ये जाऊन दाखवेन. मला अडवणारा अजून जन्माला आलेला नाही. तुम्ही मला हुकूम देऊ नका. कॅप्टन आहात, तर कॅप्टनच राहा. इथे बादशाह नका होऊ…माझा बाप बनू नका. समजलं ना…? कॅप्टनच्या हैसियतमध्ये राहा'' याशिवाय सध्या निक्की बरंच काही वर्षा उसगांवकरांना बोलत आहे. यावर आता नेटकऱ्यांसह मराठी कलाविश्वातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याशिवाय निक्की (Nikki) घरात कोणतंच काम करत नसल्याने जान्हवी सर्वांसमोर ''मी बनवलेलं जेवण निक्कीने जेवायचं नाही'' असं सांगते. एवढंच नव्हे तर तिला जेवणही देत नाही. ''निक्की स्वत: केलेला कचरा तसाच टाकते, भांडी घासत नाही, वॉशरुम स्वच्छ करत नाही, त्यामुळे मी केलेलं जेवण तिने जेवायचं नाही'' असं जान्हवीचं म्हणणं आहे. यावरून दोघींमध्ये कडाक्याचं भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

अभिनेता पुष्कर जोग संतापला..

मराठी अभिनेता व 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पहिल्या पर्वाचा उपविजेता पुष्कर जोगने यासंदर्भात पोस्ट शेअर करत आपल मत मांडलं आहे. त्याने आपल्या पोस्ट मध्ये लिहिल आहे की, ''मला एकदा घरी पाठवा… वर्षा उसगांवकर मॅमचा एवढा अपमान मी सहन करू शकत नाही. अरे मर्दांनो उठा… त्या फिक्कीचा माज उतरावा #कहर'' या पोस्टमध्ये पुष्करने 'कलर्स मराठी' आणि 'बिग बॉस मराठी'ला देखील टॅग केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT