Tishaa Kumar And Krushna Kumar News  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tishaa kumar Death : 'बेवफा सनम' फेम अभिनेत्याच्या २० वर्षीय मुलीचं कर्करोगाने निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Tishaa kumar Passed Away : १९९५ मध्ये रिलीज झालेल्या 'बेवफा सनम' चित्रपटातील मुख्य अभिनेता कृष्ण कुमार यांच्या मुलीचं निधन झाले आहे. तिचं वयाच्या २० व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झाले आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. १९९५ मध्ये रिलीज झालेल्या वेबफा सनम चित्रपटातील मुख्य अभिनेता कृष्ण कुमार यांच्या मुलीचं निधन झाले आहे. तीशा कुमार हिचं वयाच्या २० व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झाले आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षांपूर्वीच तिला कॅन्सरचे निदान झाले होते. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. तिची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली आहे. तिच्यावर कॅन्सरसंबंधित उपचार भारतात नाही तर जर्मनीमध्ये सुरू होते. तिच्यावर मुंबईतही उपचार सुरू होते. पण मुंबईमध्ये तिच्या सुधारणा होत नव्हती म्हणून कुमार कुटुंबीयांनी तिच्यावर परदेशामध्ये उपचार घेण्याचा निर्णय घेतला. तीशा कुमार हिचे काल (१८ जुलै) जर्मनीतल्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

टी- सीरीजमधील प्रवक्त्याने माध्यमांना दिलेल्या वृत्तानुसार, "कृष्ण कुमार यांची मुलगी टीशा कुमार हिचे काल एका गंभीर आजारामुळे निधन झाले आहे. कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे आणि आम्ही विनंती करतो की कुटुंबाच्या गोपनीयतेचा (प्रायव्हसीचा) आदर करावा." ६ सप्टेंबर २००३ रोजी तिशाचा जन्म झाला होता. कृष्णा कुमार आणि तान्या सिंग हे तिचे आई- वडिल आहेत. अनेक इव्हेंट्समध्ये कृष्णा कुमार यांच्यासोबत टीशा कुमार असायची.

कोण आहेत कृष्ण कुमार?

कृष्णा कुमार हे दिवंगत निर्माता आणि टी-सीरीज कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांचे धाकटे भाऊ आहेत. त्यांचा 'बेवफा सनम' हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. या चित्रपटातील गाणी ९० च्या काळामध्ये ब्लॉकबस्टर ठरली होती. कृष्णा कुमार यांनी १९९३मध्ये रिलीज झालेल्या 'आजा मेरी जान' या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवले होते. याच वर्षी त्यांचे 'कसम तेरी कसम' आणि 'शबनम' हे चित्रपटही रिलीज झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT