Actor Parineeti Chopra spotted with Raghav Chadha in Punjab Saam TV
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra-Raghav Chadha In IPL: IPL च्या मुंबई-पंजाबच्या सामन्यात 'परिणीती भाभी जिंदाबाद'चा नारा, दुमदुमले मोहाली स्टेडियम

Parineeti Chopra-Raghav Chadha In IPL Match: राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Pooja Dange

Parineeti Chopra-Raghav Chadha Spotted At Mohali: अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. यादरम्यान दोघेही मोहाली येथे एकत्र क्रिकेट मॅच एन्जॉय करताना दिसले. मोहालीच्या स्टेडियममध्ये परिणीती चोप्राला पाहून चाहत्यांनी 'परिणिती भाभी' जिंदाबाद अशा घोषणा दिल्या आणि हे सर्व पाहून अभिनेत्री चकित झाली.

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी पंजाब क्रिकेट असोसिएशन मोहाली येथे गेलेल्या राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Latest Entertainment News)

दोघांचे अनेक फोटो देखील इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. पण व्हायरल होत असलेला व्हिडिओ खूप कमाल आहे. या व्हिडिओमध्ये परिणीती आणि राघव स्टेडियममध्ये दिसत आहेत. तर त्यांच्या समोर उभे असलेले प्रेक्षक 'भाभी जिंदाबाद' च्या जोर-जोरात घोषणा देत आहेत.

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा 'परिणिती भाभी जिंदाबाद' ही घोषणा ऐकून त्यांचे हसू आवरू शकले नाहीत. हे ऐकून परिणीतीने तिच्या डोक्यावर हात मारला. आता लोक देखील या व्हिडिओचा आनंद घेत आहेत. एका नेटकाऱ्याने म्हटले आहे, 'ये पब्लिक है भाई सब जानती हैं.'

सध्या दोघांच्या एंगेजमेंटची बरीच चर्चा आहे. 13 मे रोजी दोघेही एंगेजमेंट करणार असल्याचे बोलले जात आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या आरोपपत्रात राघवचे नाव आल्यावर हा एंगेजमेंटचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आरोपपत्रात आरोपी म्हणून त्याचे नाव नाही. नुकतेच ईडीने त्याला चौकशीसाठी बोलावले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 लाखांचे कर्ज काढले अन्...; घरकाम करणाऱ्या महिलेने 60 लाखांचा 3 BHK फ्लॅट खरेदी केला, प्रकरण कळताच नेटकरी हैराण

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह कार्यकर्त्यांकडून धडाधड राजीनामे; शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली

Pimpri Chinchwad : मध्यरात्री कारवर बसून हुल्लडबाजी; तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी दिला चोप

Gold Price Hike: लक्ष्मीपुजनाच्या आधी सोनं महागलं तरी सराफ बाजारात झुंबड का? VIDEO

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

SCROLL FOR NEXT