Bhaiyya Ji Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhaiyya Ji Collection : बॉक्स ऑफिसवर मनोज वाजपेयीचा 'भैय्या जी'ची घसरगुंडी, चार दिवसांत केली इतक्याच कोटींची कमाई

Bhaiyya Ji Box Office Collection : मनोज वाजपेयी स्टारर 'भैय्या जी' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर विशेष जादू पाहायला मिळत नाही. चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत फार कमी कमाई केलेली आहे.

Chetan Bodke

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी कायमच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. नुकताच त्याचा 'भैय्या जी' चित्रपट रिलीज झाला आहे. पण त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष जादू दाखवण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. नुकतंच चित्रपटाच्या पहिल्या चार दिवसांच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. चित्रपटाने पहिल्या चार दिवसांमध्ये विशेष कमाई केलेली नाही. जाणून घेऊया, चित्रपटाच्या कमाईबद्दल...

मनोज वाजपेयी स्टारर 'भैय्या जी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या चार दिवसांमध्ये जेमतेम ५.७० कोटींची कमाई केलेली आहे. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी १.३५ कोटी, दुसऱ्या दिवशी १.७५ कोटी, तिसऱ्या दिवशी १.८५ कोटी तर चौथ्या दिवशी फक्त ७७ लाखांचीच कमाई केलेली आहे. चित्रपटाचा एकूण आकड्यांचा आलेख पाहता चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला आहे. २० कोटींच्या बजेटमध्ये निर्मित झालेल्या ह्या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.

तर राजकुमार राव स्टारर 'श्रीकांत' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन २ आठवडे झालेले आहेत. या चित्रपटाने रिलीजनंतर १८ दिवसांत ३८ कोटींची कमाई केलेली आहे. ४० कोटींच्या बजेटमध्ये निर्मित झालेल्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर जोरदार कौतुक होत आहे. श्रीकांत बोला यांचा हा जीवनप्रवास केवळ दृष्टिहिनांसाठीच नाही तर डोळस व्यक्तींसाठीही प्रेरणादायी आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत राजकुमार रावसोबत ज्योतिका, शरद केळकर, आलया एफ आणि जमील खानही आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमारने चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT