Jugal Hansraj Spoke about not being seen in Bollywood Movies Instagram
मनोरंजन बातम्या

Jugal Hansraj On Bollywood: रोमँटिक काळातला चॉकलेटी हिरो, तरुणींचा जीव की प्राण; अचानक बॉलिवूड का सोडलं?

Jugal Hansraj : युट्युबर सल अहमद यांच्याशी झालेल्या संभाषणात, जुगलने साइन केलेल्या असंख्य चित्रपटांबद्दल नाराजी व्यक्त करत ते चित्रपट का प्रदर्शित झाले नाहीत हे सांगितले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jugal Hansraj On Bollywood Movies : पापा कहते है आणि मोहब्बतें यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमधील उल्लेखनीय अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता जुगल हंसराजने अलीकडेच त्याच्या अभिनय प्रवासाविषयी भाष्य केले आहे. जुगलने त्याच्या अभिनय कारकिर्दीत आलेल्या अडथळ्यांबद्दल खुलासा केला आहे. युट्युबर सल अहमद यांच्याशी झालेल्या संभाषणात, जुगलने साइन केलेल्या असंख्य चित्रपटांबद्दल नाराजी व्यक्त करत ते चित्रपट का प्रदर्शित झाले नाहीत हे सांगितले.

जुगलने सांगितले की त्याचे सर्व रिलीज न झालेले चित्रपट प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊसकडे आहेत. आपला अनुभव सांगताना जुगल म्हणाला, “मी अनेक चित्रपट साइन केले होते, पण काही कारणास्तव ते सुरू झाले नाहीत. काही चित्रपटांसाठी, माझ्या लूक टेस्ट देखील झाल्या, पण पुढे काही घडले नाही. हे चित्रपट प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊसकडे होते. (Latest Entertainment News)

मला वाटते की हे माझे दुर्दैव आहे. या कारणांमुळे माझ्याकडे रिलीज आणि शूटिंग कमी होते. मात्र, मी बऱ्यापैकी चित्रपट साइन केले होते. जेव्हा कोणी 3-4 चित्रपट साइन करतो, मी त्याहून आधीच चित्रपटांमध्ये काम करू शकत नव्हतो. कारण तास केलं असत तर मी अनप्रोफेशनल झालो असतो. मला अनप्रोफेशनल व्हायचे नव्हते. पण जेव्हा त्या चित्रपटांचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे मी, मला त्याआधी आणि त्यानंतर ऑफर झालेले चित्रपट गमावून बसलो.

जुगलचा संघर्ष केवळ अभिनयापुरता मर्यादित नव्हता. लेखन आणि दिग्दर्शनात स्वतःला झोकून देऊनही त्याने दिग्दर्शन क्षेत्रात तितकीच आव्हाने पेलली. तो म्हणाला, “दिग्दर्शक म्हणूनही तेच घडले. एक-दोन चित्रपट सुरू होणार होते आणि झाले नाहीत. २-३ वर्षे उलटून गेली, त्यामुळे मी थोडा नाराज आणि निराश झालो. स्टुडिओत नोकरी करायचं ठरवलं. मात्र, त्यातही मला फारसा रस वाटला नाही.”

जुगल पुढे म्हणाला की, मी परत आला आहे आणि स्थिरावलो आहे, फ्रीलांसर म्हणून काम करत आहे आणि अभिनय कारकीर्द पुन्हा सुरू केली आहे.

1990 मध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी त्यांना साइन केले तेव्हा त्यांना आलेल्या आव्हानांनाही अभिनेत्याने शेअर केले. जुगल म्हणाले, “दीड वर्षांपासून तो चित्रपट सुरू झाला नाही. मग पहलाज निहलानी यांनी मला साइन केले, पण तो प्रोजेक्ट सुरू झाली नाही. त्यामुळे माझ्या संपूर्ण कारकिर्दीत असे अनेक चित्रपट आले जे मी फिक्स झाल्यानंतरही सुरू झाले नाहीत, जर ते सर्व चित्रपट ठरल्याप्रमाणे सुरू झाले असते तर मी अजून खूप काम केले असते. (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT