Jeremy Renner  Saam tv
मनोरंजन बातम्या

Jeremy Renner : अॅव्हेंजर्स एंडगेम अभिनेता जेरेमी रेनरचा अपघात; प्रकृती नाजूक, रुग्णालयात उपचार सुरू

अॅव्हेंजर्स एंडगेम अभिनेते जेरेमी रेनरचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे

साम टिव्ही ब्युरो

Jeremy Renner Helth Update : अॅव्हेंजर्स एंडगेम अभिनेते जेरेमी रेनरचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रेनर हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. जेरेमी रेनरचा अपघात झाल्याने त्याच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, स्नो प्लोइंग (बर्फ नांगरणी) करताना जमीनीवरील बर्फ हटवावा लागतो. बर्फ हटवताना जेरेमीचा मोठा अपघात झाला. जेरेमी रेनरने नुकत्याच एका मुलाखतीत अपघाताबाबत माहिती दिली. अपघातानंतर एअर लिप्ट करून रुग्णालयात दाखल केल्याची माहिती स्वत: जेरेमीने दिली. जेरेमीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

चाहते करताहेत प्रार्थना

जेरेमी रेनर प्रसिद्ध अभिनेता आहे. 'अव्हेंजर्स' आणि 'कॅप्टन अमेरिका'मध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. भारतातही जेरेमीचे चाहते आहेत. जेरेमीच्या अपघाताची माहिती मिळताच चाहत्यांकडून त्याच्यासाठी चाहते प्रार्थना करू लागले आहेत.

एका रिपोर्टनुसार, 'जेरेमी रेनर नेवादाच्या रेनोमध्ये राहतो. त्या शहरात त्यांचं घर आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बर्फाचा पाऊस पडला. यामुळे उत्तर नेवादामध्ये ३५ हजार घरांची वीज गेली होती. यावेळीच जेरेमीच्या घरासमोर बर्फ जमा झाला होता. त्यामुळे जेरेमी घराजवळील बर्फ हटवत होते. बर्फ हटवतानाच जेरेमीचा अपघात झाला. या अपघात जेरेमी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोण आहे जेरेमी रेनर?

अभिनेता जेरेमी रेनर हा ५१ वर्षांचा आहे. जेरेमी हा हॉलीवूडचा कुशल अभिनेता आहे. जेरेमीला 'द हर्ट लॉकर' २०१० मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं. त्यानंतर २०११ मध्ये 'द टाऊन'साठी सहायक अभिनेताचा ऑस्कर नामांकन मिळालं होतं. तर मॉर्वल सीरीजमुळे जेरेमी घराघरात पोहोतला. जेरेमीच्या अपघातानंतर त्याचे चाहते चिंतेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

SCROLL FOR NEXT